scorecardresearch

Premium

विजयादशमीला संघाच्या नागपूर इथल्या शस्त्रपूजन कार्यक्रमाला पाहुण्यांच्या यादीत प्रथमच महिलेला स्थान

भाजपाची मातृसंस्था आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठा निर्णय घेतला आहे.

santosh yadav
संतोष यादव (फोटो- इंडियन एक्स्प्रेस)

आगामी लोकसभा निवडणूक समोर ठेवून भाजपाकडून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. असे असताना भाजपाची मातृसंस्था आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी आरएसएसच्या नागपुरातील मुख्यालयात दसऱ्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात गिर्यारोहक संतोष यादव यांच्या रुपाने एका महिलेला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. यापूर्वी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून फक्त पुरुषांनाच आमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच दसऱ्यानिमित्त होणाऱ्या शस्त्रपूजेसाठी एक महिला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

हेही वाचा >>> ठाण्यातील माधवी नाईक यांचे भाजपमधील महत्त्व वाढले ; केंद्र व राज्यात महत्त्वाची जबाबदारी

Yavatmal, mandap Collapses, Four Injured, Preparation, PM Modi, Meeting,
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळी निर्माणाधीन मंडप कोसळला, चार जण जखमी
Confusion in Thackeray group deputy leader Sushma Andhare program in nagar
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या कार्यक्रमात गोंधळ; पोलीस संरक्षणात झाला कार्यक्रम
prakash_ambedkar
“द्रौपदी मुर्मूंच्या आधी मला राष्ट्रपतीपदासाठी विचारणा”, प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट!
pimpri chinchwad resolve temple Kashi-Mathura rss Executive Board member bhaiya joshi
पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य भैयाजी जोशी म्हणाले, ‘आता काशी, मथुरेतही…’

१९२५ साली नागपूरमध्ये दसरा सणानिमित्त आरएसएसची स्थापना करण्यात आली होती. याच कारणामुळे आरएसएससाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी आरएसएसच्या नागपूरमधील मुख्यालयात शस्त्रपूजन केले जाते. तसेच यावेळी एका खास व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. यावेळी आरएसएसचे संरसंघचालक देशातील वेगवेगळ्या समस्या आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्यावर भाष्य करत असतात. यावर्षी गिर्यारोहक संतोष यादव यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले आहे. संतोष यादव या मूळच्या हरियाणा राज्यातील आहेत. एव्हरेस्ट शिखर दोनवेळा सर करणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत. २००० साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मनित केले होते.

हेही वाचा >>> पंजाब सरकारला सहा महिने पूर्ण; भ्रष्टाचारापासून ते ऑडिओ क्लीपर्यंत ‘ही’ सहा प्रकरणं राहिली वादग्रस्त

आरएसएस ही फक्त पुरुषांची संघटना आहे, असा आरोप सातत्याने करण्यात आलेला आहे. पुढे १९३६ साली आरएसएसकडून ‘राष्ट्र सेविका समिती’ची स्थापन करण्यात आली. यामध्ये फक्त महिला स्वयंसेविका असतात. असे असले तरी संघाची ओळख ही पुरुष स्वयंसेवकांच्या रुपातच आहे, असे म्हटले जाते. राष्ट् सेविका समितिची रचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच आहे. आरएसएसमध्ये स्वयंसेवक तर राष्ट्र सेविका समितीमध्ये प्रचारिका असतात. महिला प्रचारिकांच्या प्रशिक्षण शिबिरांना संघ शिक्षा वर्ग म्हटले जाते.

हेही वाचा >>> ज्युनियर एनटीआर ते प्रभास; आंध्र प्रदेश, तेलंगणात ताकद वाढवण्यासाठी भाजपाला ‘स्टार पॉवर’ची मदत होणार का?

दरसा सणादिवशी आरएसएसकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले जाते. यामध्ये २०१८ साली देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केले होते. याच कारणामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप व्यक्त केला होता. याव्यतिरिक्त आरएसएसच्या पाहुण्यांमध्ये एचसीएलचे संस्थापकअध्यक्ष शिव नाडर, डीआरडीओचे माजी महासंचालक विजय कुमार सारस्वत, नोबल पारितोषक विजेते कैलाश सत्यार्थी, माजी सीबीआय प्रमुख जोगिंदर सिंग, नेपाळचे माजी लष्करप्रमुख रुकमंगुड कटवाल;आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आर एस गवई यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rss dussehra event santosh yadav first woman chief guest prd

First published on: 17-09-2022 at 15:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×