धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पुलाखाली तीन मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतदेह दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.सोलापूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक ६५ वर बाभळगाव गावाजवळील पुलाखाली हे मृतदेह आढळून आले. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> रत्नागिरी : मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी मत्स्य विभागाने पोलीस बंदोबस्तात चालविला हातोडा

घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत एका पुरुषाची ओळख पटली असून तो आनंदनगर, मुरूम येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. महिला आणि दुसर्‍या पुरुषाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात मृत्यूचे कारण समजू शकले नसल्याने पोलिसांनी घातपात की अपघात या दृष्टीने तपास सुरू केला आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यांचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three bodies found in lake in tuljapur taluka zws