वाई: पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी घाट व बोगद्यात मोठी वाहतूक कोंडी झाल्याबे पुणे सातारा मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.खंबाटकी घाटात दोन वाहने बंद पडल्याने खंडाळया पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी खंडाळ्यातून बोगदामार्गे वाहने घुसल्याने साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली.खंबाटकी बोगदा ते वेळे पर्यंत पाच किमींच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी महामार्ग व भुईंज पोलीस क्रेनसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सायंकाळी उशिरा पर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज पासून तीन दिवस सुट्टी असल्याने महामार्गावर वाहतूक वाहतुकीची मोठी गर्दी आहे. पुण्याहून साताऱ्याकडे मोठ्या प्रमाणात वाहने येत आहेत. आज सायंकाळी मोठ्या कंटेनर खंबाटकी घाटातून येत असताना दत्त मंदिरा जवळ रस्त्यातच बंद पडला. याचवेळी स्वारगेट सातारा बस पाठीमागून येत होती. ही बस ही या मार्गावर याच ठिकाणी बंद पडली. यामुळे खंबाटकी घाटात एकच वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी खंडाळा गावा पर्यंत गेली. यामुळे घाटातील वाहतुकीत अडकण्यापासून सुटका करण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांनी बोगदा मार्गे आपला मोर्चा सातारा कडे वळवला. यामुळे बोगद्यात अचानक समोरून गाड्या आल्यामुळे पुढे अभ्यास झाल्याच्या शक्यतेने वाहतूक थांबली. खंबाटकी बोगद्यापासून वेळे गावाच्या पुढे पर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. याची माहिती मिळताच महामार्ग व भुईंज पोलीस महामार्गावर क्रेन सह दाखल झाले. त्यांनी बंद पडलेली वाहने बाजूला केल्यानंतर घाटातील वाहतूक सुरळीत झाली. मात्र खंबाटकी बोगद्यात व घाटात वाहतूक कोंडी झाल्याने पुणे व  सातारा दोन्हीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in khambataki ghat and tunnel amy