सध्या शाळा, कॉलेजना सुट्टी असल्यामुळे वेगवेगळे ग्रुप्स, फॅमिली कुठेना कुठे पिकनिकला जाण्याचा प्लान करत असतील. ज्यांना गावी किंवा तीन-चार दिवसांसाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणे शक्य नाही अशांचा वनडे पिकनिकवर भर असेल. उन्हाळयाच्या या दिवसांमध्ये समुद्र किनारे, वॉटर पार्कला पर्यटकांती जास्त पसंती असते. आम्ही तुम्हाला वनडे पिकनिकचे बेस्ट स्पॉट ठरु शकतील अशा पुण्याजवळच्या पाच वॉटर पार्कची माहिती देत आहोत.
अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका वॉटरपार्क
अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका हे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे वॉटर पार्क आहे. या वॉटर पार्कमध्ये १४ राईडस असून इथे लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वच वेगवेगळया राईडसचा आनंद लुटू शकतात. अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका मुंबई आणि पुण्यापासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरुन तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. खालापूर टोल नाक्यापासून इमॅजिका वॉटर पार्क चार किलोमीटर अंतरावर आहे.
अॅडलॅब्ज अॅक्वा इमॅजिका वॉटरपार्कची वेळ, शुल्क आणि अन्य सुविधांबद्दल तुम्ही इमॅजिका वॉटरपार्कच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता.
डायमंड वॉटर पार्क
पुण्याच्या लोहगाव परिसरात डायमंड वॉटर पार्क असून इथे तुम्ही वेगवेगळया २८ राईडसचा आनंद लुटू शकता. वेव्ह पूल, रेन डान्स, फॅमिली पूल, लेझी रिव्हर आणि हनी बनी असे मनोरंजनाचे वेगवेगळे पर्याय तुम्हाला या वॉटर पार्कमध्ये मिळतील. इथे पर्यटकांच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य असून जीवरक्षक पूर्णवेळ तैनात असतात.
डायमंड वॉटर पार्कची वेळ, शुल्क आणि अन्य सुविधांबद्दल तुम्ही डायमंड वॉटर पार्कच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता.
सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्क
एक दिवसाची सुट्टी प्लान करत असाल तर पुणेकरांसाठी सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्क उत्तम पर्याय आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर रावेतपासून एक किलोमीटर अंतरावर हे वॉटर पार्क आहे. वेगवेगळया वॉटर स्लाईडस, स्विमिंग पूल आणि वेव्ह पूल या ठिकाणी असून अबालवुद्ध इथे पाण्यात खेळण्याचा आनंद लुटू शकता. पर्यटकांना इथे राहण्याचा सुद्धा पर्याय आहे.
सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्कची वेळ, शुल्क आणि अन्य सुविधांबद्दल तुम्ही सेंटोसा रिसॉर्ट वॉटर पार्कच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता.
कृष्णाई वॉटर पार्क
पुण्यातील सिंहगड किल्ल्याजवळच्या दोनजी गावाजवळ कृष्णाई वॉटर पार्क आहे. पंधरा एकरमध्ये पसरलेल्या या वॉटर पार्कमध्ये तुम्ही वेगवेगळया राईडसचा आनंद लुटू शकता.
कृष्णाई वॉटर पार्कच्या वेळ, शुल्क आणि अन्य सुविधांबद्दल तुम्ही कृष्णाई वॉटर पार्कच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता.
पानशेत वॉटर पार्क
पानशेत वॉटर पार्क खडकवासला धरणाच्याजवळ आहे. अन्य वॉटरपार्कपेक्षा हा थोडया वेगळया पद्धतीचा पार्क आहे. इथे राईडस कमी आहेत पण स्पीड बोटिंग, वॉटर स्कूटर्स अशा वॉटर स्पोटर्सचा पर्याय आहे. याच गोष्टींमुळे हा वॉटर पार्क वेगळा ठरतो.
पानशेत वॉटर पार्कची वेळ, शुल्क आणि अन्य सुविधांबद्दल तुम्ही पानशेत वॉटर पार्कच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती मिळवू शकता.