‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’, अभिनेत्री कियारा आडवाणी झाली ट्रोल

पुन्हा एकदा कियारा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’, अभिनेत्री कियारा आडवाणी झाली ट्रोल

अभिनेत्री कियारा आडवाणी ही बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. तिच्या चित्रपटांमुळे, तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. ही दोघं बऱ्याच समारंभात एकत्र दिसतात. मात्र, याबद्दल अद्याप दोघांनीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आता पुन्हा एकदा कियारा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी मात्र तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा : ‘दुनियादारी २’मध्ये अभिनेता अंकुश चौधरी पुन्हा साकारणार ‘दिग्या’ची भूमिका? अभिनेत्याने केला खुलासा

सोशल मीडियावर कियाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर पावसात सिक्युरिटी गार्डला आपल्या डोक्यावर छत्री धरायला लावल्यामुळे कियारा ट्रोल झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कियारा तिच्या कारमधून उतरत असताना पाऊस सुरु झाला, त्यामुळे एक सिक्युरिटी गार्ड धावत तिच्याजवळ छत्री घेऊन आला. इतकंच नाही तर तिला पावसापासून वाचवण्यासाठी तो स्वतः मात्र भिजत होता. हे पाहून नेटकरी नाराज झाले. कियाराला पावसापासून वाचवण्यासाठी हा गार्ड स्वत: भिजत होता हे पाहून नेटकऱ्यांनी तिला खडे बोल सुनावले आहेत.

आणखी वाचा : “तुझी पँट कुठे आहे?” कियारा आडवाणीच्या शॉर्ट ड्रेसची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

‘हे लोक स्वतःची छत्री स्वतः का पकडू शकत नाहीत?’, असा सवाल एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर, ‘जर सिक्युरिटी गार्डऐवजी स्वत: ची छत्री स्वतः पकडली असती तर चालताना एवढी अवघडली नसतीस’ असे एका युजरने म्हटले आहे. यासोबतच अनेकांनी कमेंट्स करत कियाराबद्दल नाराजी व्यक्त केली आणि ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’ असे तिला सांगितले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress kiara advani got trolled know what exactly happened rnv

Next Story
न्यासा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार? अजय देवगण म्हणाला, “तिने काजोलला…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी