बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी आतापर्यंत जवळपास ३५०हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. कलाक्षेत्रामधील नावाजलेल्या पुरस्कारांवरदेखील रेखा यांनी आपलं नाव कोरलं. मात्र इतर अभिनेत्रींप्रमाणेच रेखा यांना देखील वयाच्या १५व्या वर्षी एका विचित्र प्रसंगाला सामोरं जावं लागलं. ‘अंजाना सफर’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच रेखा यांच्याबरोबर एक विचित्र घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं प्रकरण काय?
‘अंजाना सफर’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान रेखा यांचं वय फक्त १५ वर्ष होतं. सुप्रसिद्ध अभिनेते बिस्वजीत चटर्जी यांच्याबरोबर त्या चित्रपटाचं चित्रीकरण करत होत्या. राजा नवाथे दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका विचित्र प्रसंगाला रेखा यांना सामोर जावं लागलं. राजा नवाथे यांनी जेव्हा सेटवर अॅक्शन असं म्हटलं तेव्हा जवळपास पाच मिनिटं बिस्वजीत चटर्जी त्यांना किस करत राहिले. त्यादरम्यान रेखा फक्त रडत होत्या.

आणखी वाचा – Video : पाकिस्तानी अभिनेत्याला डेट करतेय अमिषा पटेल? ‘त्या’ रोमँटिक व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकामध्ये या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. वयाच्या १५व्या वर्षी अशा प्रकारचा सीन चित्रीत करण्यासाठी रेखा अजिबात तयार नव्हत्या. सहकलाकार बिस्वजीत चटर्जी यांनी त्यांना जबरदस्ती किस केलं. या घटनेनंतर बराच काळ रेखा रडतच होत्या. तर काही रिपोर्टनुसार, रेखा यांना या सीनची कल्पनासुद्धा नव्हती.

आणखी वाचा – Photos : “गैरसमज नसावा प्रिय भारताला उद्देशून…” लंडनला गेलेल्या प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

चित्रपटाचे दिग्दर्शक कट म्हटल्यानंतरही बिस्वजीत चटर्जी त्यांना सोडायला तयार नव्हते. सीन चित्रीत झाल्यानंतर सेटवरील क्रू मंडळी मात्र सीन उत्तम झाल्याने शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत होते. ‘अंजाना सफर’च्या या सीनची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली होती. तसेच रेखा यांनीसुद्धा या घटनेबाबत आपल्या पुस्तकामधून सांगितलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress rekha kiss controversy with actor biswajit chatterjee at the age of 15 during film anjana safar see details kmd