गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील क्यूट कपल आलिय भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. आलिया आणि रणबीर २०२२ सालामध्ये विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा सुरु असतानाच आलियाने तिच्या चाहत्यांना मात्र आता कोड्यात टाकलं आहे. एका व्हिड़ीओमध्ये आलियाने लग्नासंबधी चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत त्यांना कोड्यात टाकलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया भट्टने नुकताच तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत आलियाने तिच्या दैनंदिन आयुष्यातील रोजचा दिवस कसा असतो ते चाहत्यांसोबत शेअर केलंय. आलियाने एका जाहिरातीच्या शूटसाठी जात असताना या व्हिडीओची सुरुवात केलीय. यात ती तिची खास मैत्रिण आकांशा रंजन कपूरसोबत जाहिरात शूट करताना दिसतेय. तसचं सेटवरील काही क्षणही तिने शेअर केले आहेत. दिनक्रम सांगत असतानाच आलियाने सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या मागचे शुक्लकाष्ट संपेना; मुंबईतील प्रसिद्ध व्यावसायिकाकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल

यावेळी आलियाच्या मोबाईलचा स्क्रिन सेव्हर काय आहे? हा प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला आलियाने फोनची स्क्रिन दाखवत उत्तर दिलंय. यात आलियाच्या फोनवर तिचा आणि रणबीर कपूरचा एक सेल्फी असल्याचं दिसतंय. तर आलिया लग्न कधी करणार? असा प्रश्न तिला अनेक चाहत्यांनी विचारल्याचं आलिया म्हणालीय. मात्र या प्रश्नाचं उत्तर आलियाने अशा पद्धतीने दिलंय की चाहते कोड्यात पडले आहे.

आलियाने लग्न कधी करणार या प्रश्नाच उत्तर शब्दात न देता केवळ तिच्या हावभावांनी दिलंय. या प्रश्नावर आलियाने अशी काही प्रतिक्रिया दिलीय की आलिया नक्की लग्न कधी करणार हे पुन्हा एकदा अनुत्तरीतच राहिलंय.

सुरुवातीला यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२१ सालाच्या अखेरीस आलिया आणि रणबीर लग्न करणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यानंतर मात्र आलिया आणि रणबीर २०२२ सालामध्ये विविाह बंधनात अडकणार असल्याचं बोलंल जात आहे. असं असलं तरी अद्याप दोघांकडून लग्नाच्या चर्चांवर अधिकृतपणे वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt responds fan question on marriage plans with ranbir kapoor kpw