बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वी ती प्रेग्नंट असल्याचे सांगितले. आता त्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदनी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्ता तिने शेअर केलेल्या फोटोमुळे सुरु झाल्या आहेत.
नुकताच अनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती तिचा पती रोहित रेड्डीसोबत उभी असल्याचे दिसत आहे. दोघेही फोटोमध्ये हसताना दिसत आहेत. तसेच हा फोटो शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनमुळे ती प्रग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अनिताने फोटो शेअर करत ‘मी २०२१ची वाट पाहात आहे आणि त्यासाठी खूप उत्सुक आहे’ असे कॅप्शनमध्ये म्हटले. त्यानंतर सोशल मीडियावर ती प्रेग्नंट असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. पण अनिता आणि तिच्या पतीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
काही दिवसांपूर्वी पूर्वी विराट कोहली- अनुष्का शर्मा, करिना कपूर- सैफ अली खान, करणवीर बोहरा- तीजे सिद्धू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे लवकरच आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता अनिताने शेअर केलेल्या फोटो कॅप्शनमुळे ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
अनिताने ‘नागिन ४’ या मालिकेत काम केले होते. तिने विशाखा खन्नाची भूमिका साकारली होती. तसेच ‘नच बलिए ९’मध्ये त्या दोघांनी भूमिका साकारली होती. तेव्हा त्यांची जोडी हिट ठरली होती. तसेच तिने ये हैं मोहब्बतें, कव्यांजली, क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कसम या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.