‘बिग बॉस १५’ची घोषणा सुरु झाल्यापासूनच या पर्वात सहभागी होवू शकणाऱ्या अनेक सेलिब्रिटींच्या नावांची चर्चा सुरु झाली होती. यात दिशा वाकाणी, रिया चक्रवर्ती आणि अगदी निधी भानुशाली देखील सहाभाग घेणार असं म्हंटलं जात होतं. तर गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस १५’चा स्पर्धक करण कुंद्रा यांच्या अडचणी वाढवण्यासाठी त्याची एक्स गर्लफ्रेण्ड अनुषा दांडेकर बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुषाला या शोसाठी मोठं मानधन दिलं जाणार असल्याचं वृत्त देखील समोर आलं होतं. अनुषा आणि करण सहा वर्ष रिलेशलशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं होतं. तर ब्रेकअपनंतर काही दिवसांनी अनुषाने करणवर फससवणुक केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बिग बॉसमध्ये करणचा खेळ कठीण करण्यासाठी अनुषाची एण्ट्री होणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. खरं तर शो सुरु होण्यापूर्वीच अनुषाने ती या शोमध्ये सामील होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता अनुषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत या वृत्ताना आणि चर्चांना पूर्णविराम दिलाय. तिने चाहत्यांसाठी एक खुलं पत्र लिहिलं आहे.

विकी कौशलने शेअर केला ‘सरदार उधम’च्या सेटवरील जखमी अवस्थेतील फोटो, नेटकरी चिंतेत

या पोस्टमध्ये अनुषा म्हणाली, “हे माझं आयुष्य आहे जिथे मी आनंदी आहे आणि जर कुणी मला आनंदी ठवू शकत नाही हे मला कळतं तर मी तिथे थांबतही नाही. सर्व विसरण्यासाठी मला वेळ लागतो पण मी आता ते शिकलेय. जर एखादी व्यक्ती जशी दिसते तशी नाही हे माझ्या लक्षात आलं तर मी ते सोडून माझा प्रवास पुढे सुरु ठेवणं चांगलं समजते” अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.


पुढे अनुषाने तिच्या बिग बॉसच्या घराचील चर्चांवर लिहिलं, “तर पुन्हा एकदा सांगते हे माझं आयुष्य आहे. कृपा करून हा मूर्खपण थांबवा. ज्या गोष्टींता मी भाग देखील नाही अशा बिग बॉसमध्ये मी जाणार यावर उगीच पानवर लिहून ड्राम वाढवण्याचा प्रयत्न करू नका. सत्य काय ते मी आधीच सांगितलं आहे. माझी प्रत्येत पोस्ट किंवा फोटो हा माझ्या भूतकाळाशी जोडलेला नाही तर तो माझ्या प्रगतीशी जोडलेला आहे. मी एक स्वाभिमानी महिला आहे. मी स्वत:ची बॉस आहे. सिद्ध करण्यासाठी मला कोणत्याही घरात असण्याची गरज नाही. त्यामुळे जरा शांत रहा. तुम्हा सर्वांचे आभार, ज्यांनी मला जगू दिलं आणि आनंद पसरवण्याचा प्रयत्न केला.” अशा आशयाची पोस्ट लिहित अनुषाने सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anusha dandekar share post clarify reports doing bigg boss 15 kpw