अनेक अभिनेत्रींनी इस्लामसाठी अभिनय इंडस्ट्री सोडली. यामध्ये सना खान, झायरा वसीमसह सबा खान या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना भोजपुरी अभिनेत्री सबा खानने इंडस्ट्रीला अलविदा म्हटलं आणि सिनेविश्वापासून फारकत घेतली. त्यानंतर तिने सर्व पोस्टही डिलीट केल्या होत्या. अशातच आता तिने काही फोटो शेअर करत लग्नाबद्दल माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “नकाब घालून जेवण करणं ही…”, इस्लामसाठी बॉलिवूड सोडणाऱ्या झायरा वसीमचं ट्वीट चर्चेत

सबाने काही दिवसांपूर्वी इंडस्ट्रीत काम करणे बंद केले होते, त्यानंतर अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. व्हायरल होत असलेले फोटो सबाच्या लग्नाच्या विधींचे आहेत. भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेत्री सबा खान विवाहबंधनात अडकली आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सबा खानने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लग्नातील काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.

सबाने लग्नातील फोटो शेअर करताना ‘अलहमदुलिल्लाह’ असं कॅप्शन दिलंय. सबाने तिच्या हळद व मेहंदी समारंभातील फोटोही शेअर केले आहेत.

सबा खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला इंडस्ट्रीत मोठे नाव कमवायचे आहे आणि इथे येण्यासाठी तिने घरच्यांविरुद्ध बंड केले होते, पण अचानक तिने इंडस्ट्री सोडत असल्याची घोषणा केली व सोशल मीडिया पोस्ट डिलीट केल्या. आता तिने लग्न केले असून अभिनयक्षेत्र कायमचं सोडलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhojpuri actress saba khan quit industry for islam now got married see photos hrc