बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘स्काय फोर्स’चे जोरदार प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीत त्याला लवकर झोपणं आणि सकाळी लवकर उठणं या त्याच्या शिस्तबद्ध जीवनशैलीबद्दल विचारण्यात आलं. तसेच एकदा विवेक ओबेरॉय आणि रितेश देशमुख हे पाहुणे म्हणून अक्षयच्या घरी गेले होते, पण ते रात्रीचे जेवण करत असतानाही अक्षय रात्री ९.३० वाजता झोपायला गेला होता, असं विवेक म्हणाला होता, ते खरं आहे का? याबाबत त्याने उत्तर दिलं.
एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला की तो पाहुण्यांचं आदरातिथ्य खूप चांगल्या पद्धतीने करतो. तसेच घरी आलेल्या पाहुण्यांना तो त्यांच्या कारपर्यंत सोडायला जातो. विवेकचा दावा त्याने फेटाळला. “नाही, मी असं कधीच करत नाही. मी लोकांना त्यांच्या कारपर्यंत सोडतो. मी त्यांना एकटं सोडत नाही,” असं अक्षय म्हणाला. त्यानंतर घरी तो अधूनमधून पार्ट्या ठेवतो, असं अक्षयने सांगितलं. “मी खूप चांगला होस्ट आहे. आमच्या घरी सहसा पार्ट्या होत नाहीत पण जेव्हा आम्ही पार्टीचे आयोजन करतो तेव्हा रात्रीचं जेवण लवकर करण्याचा प्रयत्न असतो. लोक येतात, थोड्या गप्पा मारतात, ज्यांना दारू प्यायची आहे ते पितात आणि मग मी त्यांना त्यांच्या कारपर्यंत सोडायला जातो,” असं अक्षयने सांगितलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा