‘कौन बनेगा करोडपती’चा पंधरावा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या २३ वर्षांपासून हा शो होस्ट करत आहेत. या कार्यक्रमादरम्यान बिग बींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. अलीकडेच अमिताभ यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील एक किस्सा प्रेक्षकांना सांगितला.
हेही वाचा : “प्रसूतीनंतर काम कसं सांभाळलंस?”, ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्रीने एका शब्दात दिलं उत्तर…
‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “B.sc शाखेतून पदवीचा अभ्यास पूर्ण करताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकही विषय माझ्या आवडीचा नव्हता. प्रवेश घेताना मी सगळ्या चुकीच्या आणि नावडत्या विषयांची निवड केली होती.”
हेही वाचा : Bigg Boss 17: ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात झळकणार १२ सेलिब्रिटी, अंकिता लोखंडेसह ‘ही’ नावं आली समोर
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, “कॉलेजमधून परीक्षेची तारीख जाहीर झाल्यावर मी अभ्यास रट्टा मारायचो. साधारण २ महिनेआधी पाठांतर करायला घ्यायचो आणि परीक्षेला जायचो. एवढे कष्ट घेऊनही मी भौतिकशास्त्र विषयात नापास झालो होतो. त्यानंतर दुसऱ्यावेळी परीक्षा दिली तेव्हा मी पास झालो.”
दरम्यान, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच ते ‘गणपथ’, ‘घूमर’, ‘कल्की’ अशा चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.