scorecardresearch

Premium

Bigg Boss 17: ‘बिग बॉस’च्या नव्या पर्वात झळकणार १२ सेलिब्रिटी, अंकिता लोखंडेसह ‘ही’ नावं आली समोर

‘बिग बॉस’च्या नव्या पर्वातील १२ स्पर्धक कोण आहेत? जाणून घ्या

bigg boss 17
'बिग बॉस'च्या नव्या पर्वातील १२ स्पर्धक कोण आहेत? जाणून घ्या

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’चं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. १५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस १७’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहेत. अशातच ‘बिग बॉस’ सुरू होण्याच्या १० दिवसाआधी स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. अभिनेत्री अंकिता लोखंडे व्यतिरिक्त यंदाच्या सीझनमध्ये कोण-कोण झळकणार जाणून घ्या…

हेही वाचा – परिणीती चोप्रानंतर आता विद्युत जामवाल अडकणार लग्नबंधनात? जाणून घ्या कोण आहे होणारी पत्नी

KL Rahul IPL 2024 Shoot Video Viral
VIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला
malabar gold titan and 4 other indian brands get place on global luxury goods list
मलाबार गोल्ड, टायटनसह चार नाममुद्रांना जागतिक मानांकन
This bangle seller from Goa has charmed the internet with her fluent English
“फाडफाड इंग्रजी बोलतेय ही अशिक्षित महिला!” समुद्र किनाऱ्यावर बांगड्या विक्रेत्या महिलेने जिंकले नेटकऱ्यांचे मन
A woman saree stuck in the wheel of a two-wheeler a cleaning worker help them Uncle's humanity won everyone's heart Viral Video
दुचाकीच्या चाकात अडकला महिलेचा पदर, सफाई कर्मचाऱ्याने केली मदत; काकांच्या माणुसकीने जिंकले सर्वांचे मन!

‘बिग बॉस ओटीटी’चं दुसरं पर्व संपल्यानंतर प्रेक्षकांचं ‘बिग बॉस १७’ कडे लक्ष लागून राहीलं होतं. आता अखेर ‘बिग बॉस १७’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यंदाच पर्व इतर पर्वापेक्षा वेगळं असणार आहे. सिंगल विरुद्ध कपल या पर्वाची थीम आहे. कपलच्या यादीमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे नाव पहिलं आहे. त्यामुळे आता तिच्याबरोबर पती विक्की जैन देखील यंदाच्या बिग बॉसमध्ये पाहायला मिळणार आहे. बॉलीवूड लाइफच्या वृत्तानुसार, अंकिता लोखंडे आणि विक्की जैन व्यतिरिक्त बिग बॉसमध्ये आणखी दोन कपलची एन्ट्री होणार आहे. ‘गुम है किसी कै प्यार में’ फेम ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट, तर कंवर ढिल्लो आणि ऐलिस कौशिक हे दोन कपल बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहेत.

हेही वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टारसह जान्हवी कपूर करणार रोमान्स, तर सैफ अली खान साकारणार ‘ही’ भूमिका, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

तसेच सिंगलच्या यादीत हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री इशा सिंह, इशा मालवीय, जय सोनी, समर्थ जुरेल, फहमान खान आणि लोकप्रिय युट्यूबर हर्ष बेनिवाल याची नावं आहेत. त्यामुळे आता सिंगल विरुद्ध कपल ही लढत कशी रंगतेय हे येत्या काळात समजेल.

हेही वाचा – केतकी माटेगावकरचं पहिलं लग्न कोणाबरोबर झालंय? जाणून घ्या…

दरम्यान, अंकिता लोखंडे आणि विक्की जैनने बिग बॉसमध्ये जाण्यासाठीची जोरदार तयारी सुरू केली आहे. शोमध्ये एक ड्रेस पुन्हा रिपीट होणार नाही, याचा प्लॅन करत त्यांनी २०० कपडे खरेदी केले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss 17 confirmed 12 contestants is revels ankita lokhande pps

First published on: 05-10-2023 at 16:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×