सैफ अली खान व करीना कपूर बॉलिवूडमधील चर्चेतील जोडी, या जोडीचे असंख्य चाहते आहेत. या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. नुकतंच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात सैफ अली खान पापाराझींवर संतापला होता. आता त्या घटनेवरच अभिनेत्याने स्पष्टीकरण दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पापाराझी व फोटोग्राफर्स बॉलिवूड कलाकारांचे फोटो काढण्यासाठी जिम असो किंवा त्यांचे घर असो, कायम तिथे हजर असतात. अशातच ही जोडी मलायका अरोराची आई जॉयस अरोराच्या वाढदिवसाला गेले होते. घरी परतल्यावर फोटोग्राफर्सनी त्यांना पोज देण्यास सांगितलं, पण ते थांबले नाही. फोटोग्राफर्स आग्रह करत करत बरेच आत पोहोचले. तेव्हा ‘एक काम करा, तुम्ही आमच्या बेडरूममध्ये या,’ असं सैफ अली खान म्हणाला. त्यावरून पापाराझींनी अभिनेत्याची मागितली.

“ओंकार भोजने खूपच…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत

आता याच प्रकरणावर सैफ अली खान म्हणाला, “आम्ही पापाराझींशी सहयोग करतो करतो तसेच त्यांना समजूनदेखील घेतो. मात्र मी तशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली कारण पापाराझींनी आधीच स्वतःच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी तैमूरचे त्याच्या क्लासेस त्याचे फोटो काढण्याची आवश्यकता नाही. शाळेत त्यांना परवानगी नाही. कुठेतरी एक सीमारेषा आखून दिलेली आहे. आम्ही फक्त एवढेच म्हणत आहोत. बाकीचे उगाचच यावर चर्चा करत आहेत त्यांना माहितीदेखील नाही नेमकं काय घडलं आहे ते मात्र सत्य आम्हाला ठाऊक आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

सैफ अली खान लवकरच आता ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे तर अभिनेता प्रभास रामाची तर क्रिती सॅनॉन सीतेच्या भूमिकेत आहे. तर दुसरीकडे करीना कपूर दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor saif ali khan commented on paparazzi they have crossed their limits spg