अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ चित्रपट ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे २० कोटींची कमाई केली आहे. सनी देओलचा ‘गदर २’ ११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमारच्या ‘ओएमजी २’ला टक्कर देत सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण ‘गदर २’ इतर चित्रपटाला मागे टाकत बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गदर २’ समोर टिकला नाही ‘घूमर’, अभिषेक बच्चनच्या चित्रपटाची निराशाजनक कामगिरी; पहिल्या दिवशी कमावले फक्त…

‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने आठव्या दिवशी भारतात एकूण १९.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्या आठवड्यात ‘गदर २’ ने २८४.६३ कोटींची कमाई केली होती. आठव्या दिवसाच्या कमाईनंतर चित्रपटाची एकूण आकडेवारी ३०४.१३ कोटींवर पोहोचली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४०.१ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ४३.०८ कोटींचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ५१.७ कोटी कमावले. यानंतर ‘गदर २’ ने चौथ्या दिवशी ३८ कोटींची कमाई केली. १५ ऑगस्ट रोजी चित्रपटाने सर्वाधिक ५५.४ कोटींचा व्यवसाय केला.

सातव्या दिवशीही ‘गदर २’ ची क्रेझ कायम, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला; जाणून घ्या एकूण आकडेवारी

‘गदर २’ ने सहाव्या दिवशी ३२.३७ कोटी, सातव्या दिवशी २३.२८ कोटींची कमाई केली. तर आठव्या दिवशी १९.५० कोटींची कमाई केली. चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३०४ कोटी रुपये झाले आहे. अवघ्या ८ दिवसांत ३०० कोटींचा हा आकडा गाठणे ही चित्रपटासाठी मोठी गोष्ट आहे.

दरम्यान, या ‘गदर २’ च्या यशानंतर ‘गदर ३’ येणार का? याबाबत चाहते प्रश्न विचारत आहेत. याबद्दल सनी देओलने महत्त्वाची अपडेट दिली आहे. ‘गदर ३’ चित्रपट येणार का, असा प्रश्न विमानतळावर विचारल्यावर सनीने ‘होय नक्की येईल’, असं उत्तर दिलं.

‘गदर २’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत आहेत. ‘गदर २’ हा २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल आहे. तब्बल दोन दशकानंतर आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadar 2 earned 300 crore in indian box office sunny deol update about gadar 3 see video hrc