चित्रपट जगतातील लोकप्रिय पुरस्कार ऑस्करची चर्चा सुरू झाली आहे अन् प्रत्येक देश त्यासाठी चित्रपट पाठवण्यास सुरुवातही करत आहेत. ऑस्कर समितीने भारताच्या अधिकृत नोंदी सुरू केल्या असून देशभरातील २० चित्रपटांची नावे लवकरच दिली जाणार आहेत. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्कर निवडीसाठी काही चित्रपटही पाठवले आहेत, ज्यात अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ आणि अदा शर्माचा ‘द केलर स्टोरी’ या चित्रपटांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याशिवाय नंदिता दास दिग्दर्शित आणि कपिल शर्मा स्टारर ‘ज्विगाटो’सुद्धा या २० चित्रपटांच्या यादीत सामील होण्याची शक्यता आहे. ‘ईटाईम्स’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी आणि तेलुगू चित्रपटांचाही या यादीत समावेश असणार आहे. परेश मोकाशी यांचा ‘वाळवी’ हा चित्रपटसुद्धा यात सामील होणार अशी चर्चा आहे.

आणखी वाचा : “हा मूर्खपणा…” नसीरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ‘द केरला स्टोरी’च्या अभिनेत्री व दिग्दर्शकाचं वक्तव्य

या सर्व चित्रपटांसह विधू विनोद चोप्रा यांचा ‘१२ वी फेल’ हा चित्रपटही ऑस्करसाठी जाऊ शकतो. चेन्नईत आजपासून त्याचे स्क्रीनिंग सुरू होणार आहे. आणखी कोणत्या चित्रपटाची निवड होणार हे २३ सप्टेंबर रोजी जाहीर केले जाईल अन् यापैकी कोणते चित्रपट पाठवण्यात येणार आहेत हेदेखील स्पष्ट होईल.

गेल्यावर्षी ‘RRR’च्या नाटू नाटू गाण्याने इतिहास रचला होता. कारण हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याच्या गाण्याला ऑस्कर मिळाला अन् या गाण्याने रिहाना आणि लेडी गागा यांनाही मागे टाकले होते. आता या वेळी ९६ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये कोणता भारतीय चित्रपट जिंकतो आणि कोणता नामांकनांपुरता मर्यादित राहतो हे पाहण्याची सगळ्यांनाच फार उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghoomer and the kerala story amonth other will be sent for oscars 2024 avn