बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्नाचा आज वाढदिवस. अक्षय आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने त्याचे वडील दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘हिमालय पुत्र’ असं या चित्रपटाचं नाव आहे. मात्र हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर मात्र अक्षयने अधिकाधिक मेहनत करत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. कामाव्यतिरिक्त त्याचं खासंगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “पार्टीमध्ये दारू प्यायल्यानंतर…” विराट कोहलीचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, अनुष्का शर्मा म्हणाली, “त्याला…”

अक्षयने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. अक्षयची प्रेक्षकांमध्ये क्रेझ असताना दुसरीकडे तो मात्र करिश्मा कपूरच्या प्रेमामध्ये वेडा झाला होता. दोघंही एकमेकांशी लग्न करू इच्छित होते. करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी विनोद खन्ना यांच्याबरोबर दोघांच्या लग्नाची बोलणीही केली होती. पण करिश्माची आई बबिता या नात्याबाबत खूश नव्हत्या.

आणखी वाचा – शहरातला फ्लॅट सोडून महाबळेश्वरमध्ये घर बांधत तिथेच स्थायिक झाली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री; आता नवऱ्यासह करतेय शेती, म्हणाली…

करिश्माने तिच्या करिअरकडे अधिक लक्ष द्यावं असं बबिता यांचं म्हणणं होतं. म्हणूनच त्यांनी या दोघांच्या लग्नाला नकार दिला. त्यानंतरच अक्षयने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीमध्ये अक्षयने म्हटलं होतं की, “एका नात्यामध्ये मी फार काळ एकत्रित राहू शकतो असं मला वाटत नाही. लग्नापूर्वी नातं टिकलं नाही तर दुसऱ्या व्यक्तीचा विचार आपण करू शकतो. पण लग्नानंतर असं काही करू शकत नाही”.

आणखी वाचा – चुलत बहिणीबरोबरच दीपिका पदुकोणच्या वडिलांनी थाटला संसार, अभिनेत्रीच्या वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

“दुसरी गोष्ट मला लहान मुलं अजिबात आवडत नाहीत. म्हणूनच मी लग्न केलं नाही. मला एकटंच राहायला आवडतं”. अक्षय आजही सिंगलच आहे. यापूर्वी त्याचं नाव ऐश्वर्या रायशीही जोडलं गेलं होतं. ऐश्वर्याला पाहिलं की, तिच्या चेहऱ्याकडे बघतच राहावसं वाटतं असं अक्षयने एका मुलाखतीत म्हटलं होतं. ऐश्वर्यालाही अक्षय आवडत असल्याच्या त्यावेळी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday akshay khanna know about actor love life he madly in love with karishma kapoor aishwarya rai see details kmd