‘धर्मा प्रॉडक्शन’ने आजपर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये ‘ब्रह्मास्त्र’, ‘गुंजन सक्सेना’, ‘डिअर जिंदगी’, ‘वेक अप सिड’, ‘ये दिल है मुश्किल’, ‘लंच बॉक्स’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘गुमराह’, ‘कुछ कुछ होता है’, अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. ‘धर्मा प्रॉडक्शन’ची स्थापना ही यश जोहर यांनी केली होती. १९८० साली दोस्ताना या चित्रपटातून कंपनीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्यानंतर धर्मा प्रॉडक्शन हाऊसचे सलग काही चित्रपट अपयशी ठरले. त्यामुळे यश जोहर यांना मोठा फटका बसला. सध्या ही कंपनी करण जोहर(Karan Johar) चालवत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत, करण जोहरने त्याच्या वडिलांच्या संघर्षाविषयी भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमच्या कंपनीचे एकापाठोपाठ एक असे…

करण जोहरने कोमल नहाटा यांच्याबरोबर संवाद साधला. १९९० साली प्रदर्शित झालेला ‘अग्निपथ’ बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर त्याचा खूप खोलवर परिणाम यश जोहर यांच्यावर झाला होता, अशी आठवण सांगत करण जोहरने म्हटले, “एक वेळी अशी होती आम्हाला बेघर व्हायला लागले असते. कारण- आमच्या कंपनीचे एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. १९८४ साली प्रदर्शित झालेला रमेश तलवार यांचा ‘दुनिया’, १९८७ साली प्रदर्शित झालेला प्रकाश मेहरा यांचा ‘मुक्कदर का फैसला’ आणि मुकुल एस. आनंद यांचा १९९० साली प्रदर्शित झालेला ‘अग्निपथ’ हे चित्रपट अपयशी ठरले. हे चित्रपट मोठे होते. कारण- या चित्रपटात काम करणारे कलाकार व दिग्दर्शक हे लोकप्रिय होते. पण जेव्हा ‘अग्निपथ’ फ्लॉप ठरला, त्यावेळी माझ्या वडिलांना खूप वाईट वाटले. कारण- त्यांना वाटले होते की, हा चित्रपट चालणार आहे. त्यानंतर १९९३ ला प्रदर्शित झालेला ‘गुमराह’ व १९९८ ला प्रदर्शित झालेला ‘ड्युप्लिकेट हा चित्रपटसुद्धा फ्लॉप ठरला. मात्र, १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला मोठे यश मिळाले.

कुछ कुछ होता है हा सिनेमा चांगलाच गाजल्याचे पाहायला मिळाले. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने कमाईचे उच्चांक गाठले होते. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी, काजोल, जया बच्चन, सना सईद यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले.

दरम्यान, १९९० साली प्रदर्शित झालेल्या अग्निपथ या चित्रपटात अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती हे प्रसिद्ध कलाकार होते. २०१२ मध्ये पुन्हा एकदा नव्याने अग्निपथ हा चित्रपट बनवला गेला. त्यामध्ये हृतिक रोशनची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाला मात्र बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाल्याचे पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karan johar reveals as consecutive dharma films flopped he would have been homeless says my father was heartbroken when agneepath failed nsp