अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची काही दिवसांपासून चर्चा आहे. दोन्ही कलाकारांनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेहनत घेतली होती. त्यांच्या अनेक चाहत्यांनी फर्ट डे फर्स्ट शो पाहिला असून आता ते या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता रणबीरच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्दर्शक लव्ह रंजन कायमच आपल्या चित्रपटातून मैत्री, प्रेम, भावना या गोष्टी दाखवत असतात. हा चित्रपट आजच्या नातेसंबंधावर भाष्य करणारा दिसून येतो. आता या चित्रपटाचे शोज वाढवले गेले आहेत. व्हायरल भयानी यांनी दिलेल्या माहितीनुसार आता या चित्रपटाचे मध्यरात्री शोज लावण्यात येणार आहेत. होळीच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी ही शक्कल लढवण्यात आली आहे. याआधी शाहरुखच्या पठाण चित्रपटाचे शोज मध्यरात्री ठेवण्यात आले होते.

Video : प्रसिद्ध भोजपुरी गायकाबरोबर घडला भयानक प्रसंग; गाण्यास नकार दिला म्हणून प्रेक्षकांनी भिरकावला दगड

चित्रपटासंदर्भात आणखीन एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे काही तासांतच हा चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो. हा चित्रपट अनेक टोरेंट साइट्सवर एचडीमध्ये उपलब्ध झाला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 1080p, 720p, 480p, 360p, 240p, HD मध्ये Filmyzilla, Movierulez, Telegram, Tamilrockers, 123movies अशा अनेक साईट्सवर लीक झाला आहे. याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर होऊ शकतो.

दरम्यान या चित्रपटात रणबीर श्रद्धा कपूरच्याबरोबरीने डिंपल कपाडिया, बोनी कपूर आणि कॉमेडियन अनुभव सिंग बस्सी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिनेता म्हणून बोनी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir shraddha kapoor starter tu jhutti main makkar now having midnight shows spg