सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची. आज मंगळवारी ७ फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थ विवाहबंधनात अडकणार आहेत. त्या दोघांच्या लग्नापूर्वीच्या सभारंभाचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराने लग्नासाठी राजस्थानमधील जैसलमेर ही जागा निवडली आहे. पण सिद्धार्थ आणि कियाराला जैसलमेरमध्ये लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीचे नाव आता समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरु होते. काही महिन्यांपूर्वी ते लग्नासाठी योग्य जागा शोधत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. यासाठी त्यांनी भारतासह परदेशातील अनेक ठिकाणांची निवडही केली होती. मात्र काही दिवसांपूर्वी ते दोघेही भारतात लग्न करण्यासाठी आग्रही असल्याचे समोर आले. त्या दोघांनाही डेस्टिनेशन वेडींग करायचे होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या शाही विवाहसोहळ्यासाठी राजस्थानमधील जैसलमेर ही जागा निवडली.
आणखी वाचा : Video : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या संगीत सोहळ्यात ‘या’ बॉलिवूड गाण्यावर थिरकले कलाकार, पाहा व्हिडीओ

राजस्थानच्या जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियारा विवाहबद्ध होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसचे फोटो-व्हिडीओ समोर येताना दिसत आहेत. राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस हा जैसलमेर शहरापासून १६ किलोमीटर दूर आहे. हा पॅलेस ६५ एकर परिसरात पसरलेला आहे. हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. या पॅलेसची निवड करण्यासाठी त्यांना एका बॉलिवूड अभिनेत्रीने मदत केल्याचे बोललं जात आहे.

आणखी वाचा : Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : ८४ खोल्या, ९२ बेडरुम, व्हिला, पूल अन्…; सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नासाठी एका दिवसाचे भाडे किती? 

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्याशी संबंधित जवळच्या सूत्रांनी बॉलिवूड लाइफला दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कतरिना कैफने सिद्धार्थ आणि कियाराला राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्न करण्याचा सल्ला दिला होता. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनीही राजस्थानमध्ये कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर त्यांनी सिद्धार्थ आणि कियाराबरोबर याबद्दल चर्चा करत त्यांचे अनुभव शेअर केले होते. त्यानंतर सिद्धार्थ-कियाराने राजस्थानमधील जैसलमेरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार होते. पण त्यानंतर ही तारीख बदलून ७ फेब्रुवारी अशी करण्यात आली. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे लग्न आज पार पडणार असून संध्याकाळी यांनी रिसेप्शन सोहळा आयोजित केला आहे. सूर्यगढ पॅलेसमध्येच हा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra kiara advani to get married in rajasthan royal haveli due to katrina kaif know the reason nrp