scorecardresearch

Video : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या संगीत सोहळ्यात ‘या’ बॉलिवूड गाण्यावर थिरकले कलाकार, पाहा व्हिडीओ

Video : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या संगीत सोहळ्याचा खास व्हिडीओ

Sidharth Malhotra and Kiara Advani Sangeet night
Video : सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या संगीत सोहळ्याचा खास व्हिडीओ

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरु आहे. अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल नुकतंच विवाहबंधनात अडकले. त्यानंतर आता बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकणार आहेत. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा आज ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. आता त्यांच्या लग्नाच्या पूर्वीच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. नुकतंच कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या संगीत सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे.

कियारा आणि सिद्धार्थ डेस्टिनेशन वेडींग करणार असून त्यासाठी त्यांनी राजस्थानमधील जैसलमेर ही जागा निवडली आहे. राजस्थान जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेस ते दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी उपस्थित आहेत. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ-कियाराच्या हळदी आणि संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संपूर्ण सूर्यगढ पॅलेस गुलाबी रंगाच्या दिव्यांनी उजळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : ८४ खोल्या, ९२ बेडरुम, व्हिला, पूल अन्…; सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नासाठी एका दिवसाचे भाडे किती? 

कियारा आणि सिद्धार्थचा संगीत सोहळा सोमवारी ६ फेब्रुवारीला पार पडला. यावेळी उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर जबरदस्त डान्स केला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनीही त्या दोघांसाठी एक विशेष डान्स केला. यावेळी उपस्थित लोक ‘गोरी नाल’, ‘रंगसारी’ यासारख्या गाण्यावर थिरकताना दिसले. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आला आहे. त्यात रणवीर सिंगच्या चित्रपटातील ‘मल्हारी’ गाणं वाजताना दिसत आहे.

आणखी वाचा : लग्न सिद्धार्थ-कियाराचं, चर्चा मात्र ईशा अंबानीच्या बॅगेची; जाणून घ्या काय आहे किंमत?

तसेच त्यांच्या हळदी सोहळ्यासाठी सूर्यगढ पॅलेसवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी पिवळ्या रंगाचा वापर करत मंडप सजवण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यापूर्वी कियाराचा मेहंदीचा कार्यक्रमही पार पडला होता. त्यावेळी संपूर्ण पॅलेसला गुलाबी रंगात रोषणाई करण्यात आली होती. त्यावेळी चुडा भरण्याचा कार्यक्रमही करण्यात आल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसमध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी राजस्थान नृत्य करणारे कलाकारही बोलवण्यात आले आहेत. सिद्धार्थ आणि कियाराचा लग्नसोहळा शाही थाटात रंगणार आहे. या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 13:47 IST
ताज्या बातम्या