हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री अरुणा इराणी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता त्या मोठ्या पडद्यापासून दूर आहेत, पण एकेकाळी त्यांनी सिनेसृष्टी गाजवली. ‘बेटा’ व ‘दूध का कर्ज’ सारख्या उत्तम चित्रपटांचा भाग राहिलेल्या अरुणा इराणींनी पडद्यावर मुख्य अभिनेत्री म्हणून विविध भूमिका साकारल्या. तसेच त्यांनी खलनायिकेच्या भूमिकाही केल्या.

अरुणा इराणी यांच्या अभिनयाची व चित्रपटांची जितकी चर्चा झाली तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले होते. अरुणा इराणींचे नाव मेहमूदशी जोडले गेले होते. पण मेहमूद आधीच विवाहित होते. त्यानंतर अरुणा यांनी दिग्दर्शक कुकू कोहलीशी लग्न केलं. कुकू देखील विवाहित होते. लग्न करूनही अरुणा इराणी यांनी कधीही आई न होण्याचा निर्णय घेतला.

कुकू कोहलीशी लग्न का केले? आणि नंतर आई न होण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल अरुणा इराणी यांनी सांगितलं. लेहरान रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत अरुणा यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य, चित्रपट करिअर या सर्व गोष्टींवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. पुन्हा विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडण्याबद्दल अरुणा म्हणाल्या, “कधीकधी एखादी व्यक्ती एकटी असते आणि एखाद्याच्या प्रेमात पडते. त्यावेळी फक्त आजचे सुख दिसते, उद्याचे दुःख दिसत नाही. कुकूला सोडून दुसऱ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून कुकू आपल्या कुटुंबात आनंदी राहू शकेल पण त्याने मला जाऊ दिलं नाही.”

आई न होण्याच्या निर्णयाबद्दल अरुणा इराणी म्हणाल्या…

अरुणा इराणींनी लग्नानंतर आई न होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं. अरुणा इराणींचा जन्म त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नापासून झाला होता, त्यामुळे त्यांनी वाईट गोष्टी अनुभवल्या होत्या. “लहानपणी मला वडिलांना सर्वांसमोर पप्पा म्हणण्याची परवानगी नव्हती आणि मला हे अजिबात आवडत नव्हतं. म्हणूनच माझ्या मुलांना अशा कोणत्याही गोष्टींचा सामना करावा लागू नये असं मला वाटत होतं,” असं अरुणा इराणी म्हणाल्या.

मुलांनी वडिलांबद्दल विचारलं असतं…

बाळ झालं असतं तर त्याच्या संगोपनासाठी घरी बसावं लागलं असतं, असं अरुणा इराणी म्हणाल्या. “मदतनीसवर अवलंबून राहून मूल जन्माला गालू नये. जर मला मुलं झाली असती तर त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल विचारलं असतं आणि कदाचित यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असता,” असं अरुणा इराणींना वाटतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांशिवाय आयुष्यात आनंदी आहे. कारण आपल्या मुलांनी कधीही समाजाचं ऐकावं किंवा एकटेपणा अनुभवावा, असं वाटत नसल्याचं अरुणा यांनी नमूद केलं.