आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

कंडोम कंपनीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

Condom Brand Hilarious Post meme on Ranbir Kapoor Alia Bhatt Pregnancy
कंडोम कंपनीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आलिया आणि रणबीर १४ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले. तरी सुद्धा अजूनही त्यांच्या लग्नाच्या चर्चा या सुरुच आहेत. या सगळ्यात काल आलिया आणि रणबीरने त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आलिया आई होणार आहे. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे कंडोमच्या शुभेच्छेने वेधले आहे.

आणखी वाचा : राज ठाकरेंबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’मधील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात

आलिया आणि रणवीरला शुभेच्छा देत, ड्युरेक्स इंडियाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. रणबीरच्या एका सुपरहीट गाण्याच्या ओळी बदलत एक पोस्ट शेअर केली आहे. ‘महफिल में तेरी हम तो क्लिअरली नहीं थे’ अशी भन्नाट पोस्ट शेअर करत त्यांनी आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर

पाहा फोटो

आणखी वाचा : हा शरद पोंक्षे तूच ना? जुना व्हिडीओ शेअर करत आदेश बांदेकरांनी केला सवाल

पाहा आलियाची पोस्ट

आणखी वाचा : “तुला जी मदत लागेल ती मी…”, मंगेश देसाईंनी सांगितला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या पडद्यामागचा एकनाथ शिंदेंसोबतचा ‘तो’ किस्सा

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली होती. आलियाने शेअर केलेल्या या फोटोत ती रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. याशिवाय त्या फोटोत रणबीर आलियाच्या बाजुला असल्याचे दिसत आहे. तर आलियाने नवीन पाहुण्याची चाहूल दर्शवणारा सिंहाच्या कुटुंबाचा प्रातिनिधक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “आमचं बाळं लवकरच येतं आहे”, असे कॅप्शन दिले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Condom brand hilarious post meme on ranbir kapoor alia bhatt pregnancy and congratulated them dcp

Next Story
VIDEO : राजकीय वातावरण तापलेलं असताना जितेंद्र आव्हाड यांचं सिनेसृष्टीत पदार्पण, व्हिडीओ केला शेअर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी