पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या अपघाती निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या निधनानं दीपची गर्लफ्रेंड रीना रायला मोठा धक्का बसला आहे. आता रीनाने पहिल्यांदाचा सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
रीनाने दीपसोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत “मी आतून तुटून गेले. कृपया तुझ्या सोलमेटकडे परत ये. कोणत्याच आयुष्यात मला सोडणार नाही असे वचन दिले होते. जाण माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्या हृदयाचा ठोका आहेस”, असे रीना म्हणाली.
आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?
पुढे रीना म्हणाली, “आज मी हॉस्पिटलच्या बेडवर पडून होते. तेव्हा मी कुजबुज ऐकली. मला माहित आहे की तू कायम माझ्यासोबत राहणार. आपण एकत्र आपल्या भविष्याची योजना करत होतो आणि आता तू गेलास. सोलमेट्स एकमेकांना सोडत नाहीत, मी तुला दुसऱ्या बाजूला भेटेन.”
आणखी वाचा : “करीना आणि करिश्माने मला वडील म्हणून दत्तक घ्यावे”, रणधीर कपूर यांनी व्यक्त केली इच्छा
दीप सिद्धू व्हॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी गर्लफ्रेंड रीना रायसोबत त्याच्या कारमधून दिल्ली ते पंजाब असा प्रवास करत होता. त्यावेळी अचानक केएमपीवर पिपली टोल प्लाझाजवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांची स्कॉर्पिओ कार एका ट्रकला जाऊन धडकली आणि हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात दीप सिद्धूचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्याची गर्लफ्रेंड रीनाची प्रकृती आता स्थीर असल्याचं सांगितलं जात आहे.