scorecardresearch

“करीना आणि करिश्माने मला वडील म्हणून दत्तक घ्यावे”, रणधीर कपूर यांनी व्यक्त केली इच्छा

जाणून घ्या, रणधीर कपूर यांनी अशी इच्छा का व्यक्त केली.

randhir kapoor, karishma kapoor, kareena kapoor,
जाणून घ्या, रणधीर कपूर यांनी अशी इच्छा का व्यक्त केली.

बॉलिवूडमध्ये कपूर कुटुंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघी लोकप्रिय अभिनेत्री आहेत. या दोघी बहिणी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. या अभिनेते रणधीर कपूर यांच्या मुली आहेत. अभिनय क्षेत्रातील एका नावाजलेल्या आणि लोकप्रिय कुटुंबाचे सदस्य असून ही रणधीर कपूर यांना दोन मुलींना सांभाळणे कठीण होते.

रेडिफला दिलेल्या मुलाखतीत रणधीर म्हणाले, आज मी तरुण असतो तर बरं झालं असतं. आज काल कलाकारांना पैसे कमावणे फार सोपे आहे. पण त्या काळात असं नव्हतं. पैसे कमवण्यासाठी आम्ही प्रचंड मेहनत केली. माझ्या दोन मुली आहेत. करीना आणि करिश्माची ट्यूशनची फी, विजेचं बिल आणि पत्नीच्या सगळ्या गोष्टींचा खर्च, माझ्या स्कॉचचा हा सगळा खर्च अभिनयातून कमावलेले पैशातून करण्यात आला.

आणखी वाचा : “लतादीदी गेल्यानंतर तुम्ही जसे रडलात तसे माझ्या…”, मुमताज यांनी चाहत्यांना केली विनंती

आणखी वाचा : सुशांत सिंग राजपुतमुळे दीपिकाचा ‘गहराइयां’ झाला फ्लॉप?

पुढे रणधीर यांनी त्यांची मुलगी करीना आणि जावई सैफ अली खानसोबत त्यांचे असलेले संबंध कसे आहेत ते सांगितले. सैफ अली खानचं कुटुंब हे सर्वसामान्य कुटुंबासारखं आहे. ते कामाबद्दल अजिबात बोलत नाहीत. आम्ही कोणालाही त्यांच्या करिअरविषयी कोणता सल्ला देत नाही. आम्ही हसतो, विनोद करतो आणि एकमेकांची टिंगल उडवतो आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतो.”

आणखी वाचा : राजेश खन्नासोबत ब्रेकअपनंतर अंबानींच्या सुनेला B-Grade चित्रपटात करावे लागले होते काम!

पुढे रणधीर म्हणाले, बरं, मला अजूनही फक्त एक बायको आणि दोन मुली आहेत. इतक्या वर्षांत माझ्या आजूबाजूला काहीही बदलले नाही. फक्त एकच गोष्ट आहे की मी आता त्यांच्यासोबत राहत नाही. मुलींचे लग्न झाले असून त्यांना स्वतःचे घर आहे आणि बबिता एकटी आनंदात आहे. तिने पुन्हा लग्न केले नाही आणि मला ही करायचे नाही. माझ्या मुली आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेल्या आहेत. खरंतर, माझ्या दोन्ही मुली माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत. मी तर मजेमजेत त्यांना नेहमी सांगत असतो की मला दोघींनी वडील म्हणून दत्तक घ्या म्हणजे मी पण श्रीमंत होईन. मी अजूनही बबिताला भेटतो, आम्ही डिनरला जातो. आम्ही असे आमचे आयुष्य जगतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2022 at 12:19 IST

संबंधित बातम्या