आगामी काळात अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीच नव्या चित्रपटातील एका गाण्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं चांगलंच चर्चेत आलं आहे. या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यात आता अयोध्यातील महंत राजू दास यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महंत राजू दास म्हणाले, “बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपट सातत्याने सनातन धर्माची खिल्ली उडवतात. तसेच, हिंदू देवी-देवीतांचे अपमान करण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतात. पठाण चित्रपटात दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकिनी घालून संतांच्या आणि देशाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. सनातन धर्माची शाहरुख खान सत्ता खिल्ली उडवतो. भगव्या रंगाची बिकिनी घालून अशा गाण्यात नाचण्याची गरज काय होती?,” असा सवाल महंतांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “मी यापेक्षा जास्त…” ‘पठाण’ चित्रपटाला विरोध करणाऱ्या भाजपा मंत्र्यांवर आदिश वैद्य संतापला

“धार्मिक भावना दुखावण्यासाठी हे जाणूनबुजून करण्यात आले. या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी करत महंत दास यांनी म्हटलं, “प्रेक्षकांना ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतो. ज्या ठिकाणी चित्रपट प्रदर्शित केला जाईल, तेथील चित्रपटगृहे जाळून टाकावीत,” असेही महंत दास म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire pathaan will be screened say mahant raju das over saffron costumes ssa