बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया आणि अंगद बेदीच्या घरी पुन्हा एकदा चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. नेहा धूपियाने मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी नेहाचा पती अभिनेता अंगद बेदीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. अंगदने ही बातमी देताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अंगदने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोघांचा एक छानसा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने मुलगा झाला असल्याची माहिती दिली आहे. “देवाच्या आशीर्वादाने आज आम्हाला मुलगा झाला आहे. नेहा आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. #बेदीबॉय वाहेगुरु मेहर करें नेहा या प्रवासा दरम्यान हिंमत दाखवली याबद्दल धन्यवाद आणि आता या पुढचा प्रवास नकीच आपल्या चौघांसाठी अविस्मरणीय ठरेल”, अशा आशयाचे कॅप्शन देत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
नेहाने दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची गूड न्यूज यापूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली होती. त्यानंतर, आज तिने एका चिमुकल्याला जन्म दिला आहे. दरम्यान ४० वर्षांच्या नेहा धूपियाने २००२ साली मिस इंडियाचा किताब जिंकला होता. २००३मध्ये ‘कयामत’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १० मे २०१८मध्ये नेहाने अंगद बेदीशी लग्न केले.