अभिनेत्री अनुष्का शर्मा बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती अखेरची शाहरुख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. शाहरुख लवकरच ‘पठाण’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. पण अनुष्काचा अभिनय पाहण्यासाठी मात्र तिच्या चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. अनुष्का शर्मा लवकरच महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये काम करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता ती या चित्रपटात दिसणार नसल्याचं बोललं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का शर्मा आता या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार नाही. मागच्या काही महिन्यामध्ये या प्रोजेक्टमध्ये बरेच मोठे बदल झाले आहेत. त्यानुसार अनुष्का आता फक्त या चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमचा भाग असणार आहे. तर आता या बायोपिकमध्ये अनुष्काच्या जागी अभिनेत्री तृप्ती डिमरीला घेतल्याचं बोललं जात आहे. चित्रपटाचं शूटिंग २०२२च्या सुरुवातीला सुरू होणार आहे.

हा चित्रपट सुरुवातीला चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय तृप्तीला या चित्रपटासाठी खास प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तिचं ट्रान्सफॉर्मेशन केलं जाणार आहे आणि यासाठी तिला काही महिन्याचं कठोर प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. या प्रशिक्षणाच्याच कारणानं अनुष्कानं या चित्रपटाला नकार दिल्याचं बोललं जातं.

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रॉसित रॉय याबाबत सांगतात, ‘मुलगी वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काला कोणत्याही प्रकारचं हेवी वर्कआऊट करायचं नव्हतं. त्यामुळेच तिने या चित्रपटाला नकार दिला. ती सध्या हलक्या- फुलक्या विनोदी किंवा रोमँटिक चित्रपटांमध्ये काम करण्याचा विचार करत आहे. यासोबतच तिला आई म्हणून स्वतःच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhulan goswami biopic tripti dimri replace anushka sharma in a movie mrj