२०२१ मध्ये बॉक्स ऑफीसवर अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला. यातील अल्लू अर्जुनची स्टाइल, डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकली. याबरोबरच यातील गाणीही चांगलीच गाजली. त्यापैकीच ‘श्रीवल्ली’ आणि ‘सामे सामे’ ही दोन गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. त्यापैकी जावेद अलीने गायलेलं ‘श्रीवल्ली’ हे गाणं सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून चांगलंच लोकप्रिय झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता या गाण्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चेत आले आहेत. नुकत्याच एका व्हायरल व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे श्रीवल्ली हे गाणं गातान दिसले आहेत. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच गाण्याचे मूळ गायल जावेद अलीसुद्धा दिसत आहेत.

आणखी वाचा : ‘टायगर ३’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार सुरुवात; सकाळी लवकरच्या शोबद्दल नवी माहिती समोर

एका खासगी पार्टीत जावेद अली हे गाणं गात असताना तिथे उपस्थित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले आणि त्यांच्यासमोर त्यांनी माइक धरला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याबरोबर साथ देत ‘श्रीवल्ली’ गण्याचं कडवं गाऊन दाखवलं.

भारतीय बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘पुष्पा’मधील हे गाणं रील्सच्या माध्यमातून चांगलंच व्हायरल झालं. मध्यंतरी क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने एका सामन्यादरम्यान या गाण्यावर केलेलं नृत्य पाहून सगळेच थक्क झाले होते. देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra deputy chief minister devendra fadanvis sings srivalli song along with javed ali avn