अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक जण ‘वाय’ अक्षराचे पोस्टर शेअर करत आहेत. अनेक कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवर हा फोटो शेअर करत पाठिंबा दर्शवताना दिसत आहेत. नुकतंच वाय या मराठी चित्रपटाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. सध्या या पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुक्ता बर्वे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच मुक्ता बर्वे हिने तिच्या आगामी वाय या चित्रपटाचे एक नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे ही आक्रमक अदांजात दिसत आहे. यात ती हातात मशाल घेऊन लढताना दिसत आहे.

कागदावर ‘Y’ अक्षर लिहित खासदार सुजय विखेंनी दिला मुक्ता बर्वेला पाठिंबा, फोटो व्हायरल

“अंधाराच्या भीतीने मशाल का कधी विझत असते…अस्तित्वाच्या या लढ्यात ‘ती’ येतेय… स्वतः मशाल होऊन…! ‘ वाय ‘…२४ जूनपासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात”, असे तिने हे पोस्टर शेअर करताना म्हटले आहे. तिचा हा लढा नेमका कोणासाठी आहे आणि का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहेत.

“माझा पाठिंबा आहे…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या चित्रपटात मुक्ता बर्वेसोबत अनेक मराठी कलाकार पाहायला मिळणार आहे. मात्र सध्या तरी त्यांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. पण सध्या या चित्रपटाच्या पोस्टरची सोशल मीडियावर बरीच चर्चा पाहायला आहे.

कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress mukta barve share y movie new poster on social media nrp