आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीचा चाहता वर्ग मोठा आहे. प्राजक्ता चित्रपटाच्या शुटिंग निमित्ताने लंडनला गेली आहे. तिने लंडनमधील थेंब्स नदीच्या काठावरील फोटो शेअर करत पोस्ट लिहली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राजक्ताने लंडनमधील संस्कृतीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने ब्रिटिशांनी गुलामगिरीत फसवून आपल्या देशावर १५० वर्ष राज्य केले, याबद्दलही संताप व्यक्त केला आहे. “ने मजसी ने परत मातृभीला. सागरा प्राण तळमळला. भारताची आठवण येतेय असं म्हणणं चुकीचं ठरेल. आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो. एक क्षणदेखील हिंदुस्तान माझ्या मनातून गेला नाही. इथं मन मूळीच रमलं नाही. त्याला अनेक कारणं आहेत”, असं म्हटलं आहे. प्राजक्ताने पोस्टमध्ये लंडनमधील जीवनशैलीवरदेखील भाष्य केलं आहे.

हेही वाचा >> Big Boss 16: यंदा घरात होणार रॅपरची एन्ट्री; ‘ओके ब्रो’ म्हणत बिग बॉसच्या आवाजातील नवा प्रोमो

पुढे ती म्हणते, “ह्याच ब्रिटिशांनी आपल्याला फसवून १५० वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यांच्या भूमीत सुख कसं मिळावं? कोहिनूर परत देण्याचं काही नाव नाही. तो राग वेगळाच. राणी गेल्यानं देश दुखवट्यात आहे, ती मरगळ जाणवली. इथल्या थंडीनं नुसतं गारठून नाही, तर जखडून गेल्यासारखं झालं. कितीही सुंदर, स्वच्छ असला तरी इथे चैतन्य नाही हे पदोपदी जाणवलं. संस्कृती, खाद्यसंस्कृती, जगण्याविषयीचं तत्वज्ञान अशा अनेक बाबतीत हे लोक विशेष माठ आहेत. इथे राहत असताना त्याचे पडसाद आपल्यावर पडल्यावाचून राहत नाहीत. आणि ह्या माठांनी १५० वर्ष भारतात राहून आपली संस्कृती, शिक्षणपद्धती, पेहराव इ. गोष्टींवर ही माठगिरी बिंबवली. (आणि वैषम्य असं की आपणही मेंदू न वापरता मोठ्या प्रमाणात ती आंधळेपणानं स्वीकारली. तो अनादर ठळक झाला.)”

हेही वाचा >> “मला त्यांच्यासारखं वडील व्हायचं नाही, कारण…”,  रणबीरने ऋषी कपूर यांच्याबद्दल केलं होतं मोठं वक्तव्य

हेही वाचा >> “माझी आई बिग बॉस पाहत नाही , कारण…”, सलमान खानने केला खुलासा

“काही स्वच्छता आणि शिस्तीच्या चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत. पण क्षेत्रफळ आणि लोकसंख्या ह्यांचं गणित लक्षात घेतलं तर हे जमवणं सहजी शक्य आहे. त्यात काही rocket science नाही. कामासाठी आले नसते तर ४ दिवसात परत धूम ठोकली असती. असो… मुद्दा असा की इतर देश फिरल्यावर पदोपदी जाणवतं की सर्वच अंगांनी माझा प्रिय “भारत” किती महान देश आहे. देवाचे किती आभार मानू की मी भारतात जन्माला आले. फक्त २ दिवस बाकी. आलेच..”, असं म्हणत तिने काम संपल्यावर लगेचच भारतात परत येणार असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prajakta mali shared post on london lifestyle goes viral kak
First published on: 28-09-2022 at 17:08 IST