मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख करणारी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. सोनाली कुलकर्णी ही कायमच चर्चेत असते. सोनालीने मराठी प्रेक्षकांसोबतच देशभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. नुकतंच सोनाली कुलकर्णीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत एक प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला सोनाली कुलकर्णीने हजेरी लावले. त्याचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. या फोटोबरोबर तिने एक पोस्टही लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “ऐश्वर्या रायशी लग्न करण्यामागे तिचे सौंदर्य…” अभिषेक बच्चने सांगितले खरे कारण

सोनाली कुलकर्णीची पोस्ट

आज डॅा. नरेंद्र दाभोलकरांचा जन्मदिवस. अलका धुपकर ह्या माझ्या अत्यंत आवडत्या मैत्रिणीने पत्रकारितेच्या पुढे जाऊन स्वतःला भेडसावणाऱ्या अनेक मुद्दयांवर आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्यावर सकारात्मक पर्याय शोधला आहे.. तिने आपल्या अशाच कळकळ वाटणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर नरेंद्रकाकांविषयी मुंबईत एक प्रदर्शन भरवलं आहे चव्हाण सेंटर मधे. अनेक तरूण कलाकरांनी विलक्षण कलाकृती घडवल्या आहेत. त्यातले बहुतांश जण नरेंद्रकाकांना भेटलेही नाहीएत. पण नरेंद्रकाकांचे विचार त्यांच्यात झिरपले आहेत.

आपल्या सुंद मनांना जागं करणारा भला माणूस होता तो.. पण आपल्यातल्याच काही भेकड लोकांनी त्यांचा निर्दयपणे खून केला ! रागाचं पर्यवसान समोरच्या माणसाच्या हत्येत होणार असेल तर रोज आपल्याला ढीगाने मृतदेह बघायला मिळतील आणि हताश होण्यापलिकडे हातात काहीच उरणार नाही..

हे प्रदर्शन नक्की पहा. धर्म , देव ह्याच्या विरोधात कधीच नव्हती अंनिस.. संपूर्ण माहिती वाचताना मनातला संताप आणि आक्रोश आवरून नरेंदकाकांचे आभार मानावेसे वाटतात आणि वचनाचा पुनरूच्चार.. आम्ही सारे दाभोलकर

देवावर किंवा आपापल्या श्रध्दास्थानावर विश्वास ठेवणं हा आपला कायदेशीर हक्क आहे. त्यावर कोणी का हरकत घेईल.. पण आर्थिक / शारिरिक / मानसिक / लैंगिक शोषण आणि पिळवणूक थांबवणं – नक्कीच आपल्या हातात आहे, विचारात आहे, असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबद्दल लिहिलेल्या या पोस्टवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी त्यावर खूप छान, फारच मस्त, किती सुंदर अशा कमेंट केल्या आहेत. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress sonali kulkarni share special post after watch narendra dabholkar exhibition nrp