मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधवला ग्लॅमरस क्षेत्रातला चमकता चेहरा म्हणून ओळखले जाते. तेजश्री जाधववर सध्या दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तेजश्री जाधवचे वडील राजेंद्र जाधव यांचे निधन झाले आहे. तिने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.
तेजश्रीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत तिने तिच्या वडिलांबरोबरचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती तिच्या वडिलांच्या मांडीवर बसल्याचे पाहायला मिळत आहे. पप्पा तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केलेत असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. त्याबरोबरच तिने एक हार्ट इमोजीही शेअर केला आहे.
आणखी वाचा : ‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, सोनाली कुलकर्णीसह रसिका सुनीलच्या लूकने वेधलं लक्ष
दरम्यान तेजश्रीचे वडील राजेंद्र जाधव हे हवाई दलातील निवृत्त सार्जंट होते. त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून काम केले.
तेजश्रीला दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी मराठी मुलगी म्हणून ओळखले जाते. तेजश्रीने २०१६ मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या ‘अकिरा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘अट्टी’ या तामिळ चित्रपटात झळकली.
आणखी वाचा : “मला ही साडी…”, वनिता खरातचे पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट, पतीच्या कमेंटने वेधले लक्ष
यानंतर ती ‘माधुरी टॉकीज’, ‘द जोकर : अ स्ट्रेंज किडनॅपर’ या हिंदी वेबसीरिजद्वारे चाहत्यांच्या भेटीला आली. तेजश्री ही ‘बलोच’ या मराठी चित्रपटातही झळकली होती. यात तिने तानाबाईंची भूमिका साकारली होती. हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट होता.