scorecardresearch

Premium

‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, सोनाली कुलकर्णीसह रसिका सुनीलच्या लूकने वेधलं लक्ष

‘शॉर्ट अँड स्वीट’ चित्रपटाचा टीझर लाँच, पाहा व्हिडीओ

Sshort And Ssweet movie Teaser
'शॉर्ट अँड स्वीट' चित्रपटाचा टीझर लाँच

सध्या मराठीत विविध धाटणीचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटांवर प्रेक्षकही भरभरुन प्रेम करताना दिसतात. आता लवकरच एक कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शॉर्ट अँड स्वीट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

‘शॉर्ट अँड स्वीट’ हा चित्रपट एका वेगळ्याच विषयावर आधारित आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये एक मुलगा त्याच्या वडिलांना भेटण्यासाठी किती उत्सुक असतो, हे पाहायला मिळत आहे. इतक्या वर्षांनी घरी परतलेला संजू त्याच्या बाबांना भेटण्यासाठी उत्सुक असताना दुसरीकडे त्यांना भेटल्यावर तो नाराज का होतो, संजूचे बाबा नक्की कोण, संजूच्या आईने त्याच्यापासून ही गोष्ट का लपवली? त्याचे नेमके कारण काय असेल? याचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे.
आणखी वाचा : “मला ही साडी…”, वनिता खरातचे पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट, पतीच्या कमेंटने वेधले लक्ष

शुभम प्रोडक्शन प्रस्तुत ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका सुनील हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश दिनकर कदम यांनी केले आहे.

आणखी वाचा : सई ताम्हणकरने तिचं नवीन घर कसं शोधलं? म्हणाली “मला लॉकडाऊनमध्ये…”

“‘शॉर्ट अँड स्वीट’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून नावाप्रमाणेच स्वीट अशी ही कथा आहे. या चित्रपटाच्या टीझरवरून तुम्हाला एकंदर चित्रपटाच्या कथेबद्दल अंदाज आलाच असेल. यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत अभिनयाची छाप पाडणारे श्रीधर वाटसर आणि मालिकेतून घराघरांत पोहोचलेले हर्षद अतकरी, रसिका सुनील यांसारख्या उत्कृष्ट कलाकार झळकणार आहेत. याबरोबर यूट्यूबर आणि रील विश्वातील तुषार खैर आणि कॉमेडी किंग ओमकार भोजनेही यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असतील. हा चित्रपट मनोरंजनात्मक तसेच संवेदनशील विषयावर आधारित आहे”, असे दिग्दर्शक गणेश दिनकर कदम यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sonali kulkarni harshad atkari rasika sunil starrer sshort and ssweet official teaser release nrp

First published on: 27-09-2023 at 13:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×