मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडेंचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. प्रवीण तरडेंनी स्वत: याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. फेसबुकवर कोणत्याही मेसेजला रिप्लाय न देण्याची विनंती त्यांनी चाहत्यांना केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी प्रवीण तरडेंचं फेसबूक अकाऊंट हॅक झालं होतं. पत्नी स्नेहल तरडेंच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती त्यांनी चाहत्यांना दिली होती. आता याबाबत पुन्हा स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसाठी प्रवीण तरडेंनी पोस्ट शेअर केली आहे. “नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे. माझे फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. तेथून अनेक जणांना खोट्या लिंक्स, फोन नंबरची मागणी असे मेसेज येत आहेत. कोणीही रिप्लाय देऊ नये. धन्यवाद”, असं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> ‘आदिपुरुष’मधील रावण पात्राबद्दल दिग्दर्शक ओम राऊतची स्पष्ट भूमिका, म्हणाला “माझ्यासाठी रावण आजही…”

हेही वाचा >> Video : प्राजक्ता सूत्रसंचालनाची तयारी कशी करते?, अभिनेत्रीने शेअर केला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवरील खास व्हिडीओ

“इन्स्टाग्राम चालू आहे फेसबुक हॅक झालं आहे. कुठल्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका. माझं इन्स्टाग्राम फेसबुक लिंक असल्यामुळे हा मेसेज सुध्दा फेसबुकला दिसू शकतो. तसदी बद्दल क्षमस्व”, असंही पुढे प्रवीण तरडेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. चाहत्यांनी त्यांच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

हेही पाहा >> Photos : ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेतील सोज्वळ ‘आनंदी’चा बोल्ड लूक पाहिलात का?

प्रवीण तरडे हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला त्यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपटही खूप गाजला. या चित्रपटात त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते ही मुख्य भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director pravin tarde facebook account hack shared post on instagram kak