मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘सनी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचाही चित्रपटाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळताना दिसत होता. मात्र चित्रपट प्रदर्शित झाला आणि अवघ्या एका दिवसातच या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले. काही प्रेक्षकांना तर तिकिटाचे पैसे परत करून शो कॅन्सल झाले असल्याचं चित्रपटगृहाच्या व्यवस्थापणाने सांगितलं. याबाबत हेमंतने संताप व्यक्त केला. आता ‘सनी’मधील मुख्य अभिनेता ललित प्रभाकरनेही एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “पुन्हा मुख्यमंत्री महोदयांकडे गाऱ्हाणं घालावं का?” मराठी चित्रपटाचे शो रद्द होताच चिन्मय मांडलेकर संतापला

मराठी प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट हेमंतने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे शेअर करत सत्य समोर आणलं. हे पाहून ‘सनी’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरनेही संतप्त पोस्ट शेअर केली होती.

आता ललित प्रभाकरनेही पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे. त्याने आपल्या पोस्टच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला आहे. ललित म्हणतो, “मराठी पाऊल पडते कुठे?” ललितने पोस्ट शेअर करताच अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – अजय देवगणच्या ‘दृश्यम २’मुळे मराठी चित्रपटाचे शो रद्द? दिग्दर्शक हेमंत ढोमे संतापला, सरकारला विनंती करत म्हणाला…

मराठी चित्रपटांना शो मिळाले पाहिजे, मराठी चित्रपट जगला पाहिजे, ‘सनी’ हा खूप मस्त चित्रपट आहे अशा अनेक कमेंट ललितच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत. हेमंत ढोमेसह इतर मराठी कलाकारांनी आवाज उठवल्यानंतर तरी मराठी चित्रपटांना त्यांचे हक्काचे शो मिळणार का हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit prabhakar sunny marathi movie show gets cancelled actor angry reaction on social media see details kmd