मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती लवकरच पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार आहे. सध्या मानसी व प्रदीपच्या घटस्फोटाची अधिकृत प्रक्रिया सुरू आहे. या दरम्यान मानसीने एक पोस्ट केली आहे. तिच्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानसीची श्री स्वामी समर्थांवर प्रचंड श्रद्धा आहे. नुकतंच मानसीने वसईतील भुईगावमधील श्री स्वामी समर्थांच्या मठाचे दर्शन घेतले. तिने तिचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. याला तिने कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितलेले नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याचे कारण

मानसी नाईकची पोस्ट

“आज स्वामी समर्थ प्रकट दिन. सेवा करायची संधी मिळाली.
आज खूप छान वाटलं, या नव्या मानसीचा जन्म झालाय, त्यामुळे भिऊ नकोस मी तझ्या पाठिशी आहे. याच विश्वासाने मला माझा मार्ग दाखवला. आई बरोबर दर्शन केले.
सिद्धेश पाटील धन्यवाद, तुझ्यासारखा भाऊ लाभला याला नशीब लागते.
भुईगावचा मठ, दादा-वहिनी, सगळे सेवेकरी यांना मनापासून धन्यवाद.
आजचा दिवस खास. स्वामी तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात.
एक गोष्ट लक्षात ठेवा. अशक्य ही शक्य करतील स्वामी
कधीच हार मानायची नाही”, असे मानसी नाईकने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी लवकरच मेसेजचे स्क्रीनशॉट…” घटस्फोटावरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी जानेवारी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. सुरुवातीला त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. पण आता अचानक संसारात वादळ आल्यामुळे अवघ्या दीड वर्षातच मानसीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress manasi naik visit vasai bhuigaon shree swami samartha math caption viral nrp