कलाकार मंडळींचं खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. काही कलाकार आपल्या खासगी आयुष्याबाबतत खुलेपणाने बोलतात. तर काही याविषयी भाष्य करणं टाळतात. शिवाय या मंडळींच्या नात्याच्या तसेच अफेअरच्या चर्चाही काही कलाक्षेत्रामध्ये नवीन नाहीत. अनेक कलाकारांबाबत विविध अफवा पसरतात. पण मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेबाबत काही भलतंच घडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : लेकीच्या लग्नाचा आनंद गगनात मावेना, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा होणाऱ्या जावयाबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

नेहाने मराठीसह हिंदी मालिका, चित्रपटांमध्येही काम करत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या ती मालिका, चित्रपटांपासून दूर आहे. पण कामासह तिचं खासगी आयुष्यही कायमच चर्चेत राहिलं. ती २०२०मध्ये नेहा शार्दुलसह विवाहबंधनात अडकली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा – खरंच की काय! ही सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आहे सहा मुलांची आई? मुलाखतीत केला अजब खुलासा

प्लॅनेट मराठीच्या ‘पटलं तर घ्या’ कार्यक्रमामध्ये नेहाने हजेरी लावली होती. यावेळी तिला आतापर्यंतची तिने तिच्याबाबत ऐकलेली सर्वात वाईट अफवा याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा नेहा म्हणाली, “अफवा अशी नाही. पण मी मराठी इंडस्ट्रीमध्ये नवीन होते. तेव्हा अमृता खानविलकरला असं वाटलं होतं की, दुबईमध्ये एका शेखबरोबर माझं अफेअर सुरू आहे.”

आणखी वाचा – अभिनयासह आता महेश मांजरेकरांच्या मुलाने सुरू केलं स्वतःचं हॉटेल, नावही आहे फारच खास

“मला तिने हे स्वतः सांगितलं होतं. तेव्हा मी तिला म्हटलं होतं की, तुला असं का वाटलं? तेव्हा ती मला म्हणाली, “अगं मराठीमध्ये तू अशी एकदम छान दिसते. शरीरयष्टीही अगदी उत्तम आहे. म्हणून मला असं वाटलं की तुझं दुबईमध्ये अफेअर आहे”. यावर मी तिला असं काहीच नाही म्हटलं होतं. माझ्याशी बोलायलाच बहुतेक एखादा शेख घाबरला असावा”. नेहाच्या या उत्तराने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress neha pendse talk about her affair rumours says i am very shocked see details kmd