बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर ही बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर असली तरी तिच्या अदा मात्र एका बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही. सुरूवातील मीरा कपूर तिच्या सोशल मीडियावर सक्रिय नव्हती. पण हल्ली ती तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय झालीय. यापूर्वीही मीराने आपल्या ग्लॅमरस अंदाजात चाहत्यांची मनं जिंकली आहेत. नुकतंच मीराने तिचा एक ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटो शेअर केलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर ही तिच्या लूक आणि स्टाइलमुळे अनेकदा चर्चेत येत असते. यंदा मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक ग्लॅमरस फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये तिचा लूक खूपच शानदान दिसून येतोय. यात तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय. तिने शेअर केलेला हा फोटो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फॉरमॅटमधला आहे. हा फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘जेव्हा सोमवार हा शक्रवारपर्यंतचा आत्मविश्वास आणि बुधवारपर्यंतचा संयम असतो…’ असं लिहून तिने हा ग्लॅमरस फोटो शेअर केलाय.

मीरा सध्या तिच्या ग्लॅमरस लूकने बॉलिवूडमधल्या बड्या बड्या अभिनेत्रींना तगडी स्पर्धा देतेय. या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फोटोमध्ये मीरा खूपच फिट आणि हॉट दिसतेय. मीरा आणि शाहिदच्या लग्नाता सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या दोघांना एक मुलगी ‘मिशा’ आणि एक मुलगा ‘जैन’, अशी दोन अपत्ये आहेत. शाहिद एक परिपूर्ण फॅमिली मॅन आहे.

आणखी वाचा: “सिझेरियन डिलिव्हरी नॉर्मल आहे”; आई झाल्यानंतर उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत

मीरा आणि शाहिद हे दोघे कायम त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. सोबतच मीरा सुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mira kapoor shares black and white glamorous photo prp