‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या चर्चेत आहे. तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे लवकरच ती आता ओटीटी माध्यमावर झळकणार आहे. ‘दहाड ‘नावाच्या वेबसीरिजमध्ये ती दिसणार आहे , विशेष म्हणजे भारतात प्रदर्शित होण्यापूर्वी ही वेबसीरिज एका फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोनाक्षी सिन्हाची ‘दहाड’ ही आठ भागांची क्राईम ड्रामा वेबसीरिज आहे. यात सोनाक्षी सिन्हा एका पोलिस अधिकारी दाखवली आहे. ती इन्स्पेक्टर अंजली भाटीच्या भूमिकेत आहे. या मालिकेत राजस्थानमधील एका छोट्या शहराची कथा दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये सार्वजनिक शौचालयात अनेक महिलांचा गूढ मृत्यू होतो. आणि हे केस अंजलीकड येते. अंजलीला सुरुवातीला हे मृत्यू आत्महत्या वाटतात, पण जसजसे प्रकरण पुढे सरकत जाते तसतसे अंजलीला त्यामागील सिरीयल किलरची जाणीव होते. यानंतर पोलिस आणि मारेकरी यांच्यात एक खेळ सुरु होतो.

“मी त्यांच्या गाडीवर उडी मारली अन्…” जावेद अख्तरांनी सांगितला पंडित नेहरूंच्या भेटीचा ‘तो’ किस्सा

सोनाक्षीची ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. पण वेबसीरिज प्रदर्शित होण्यापूर्वी बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिचा प्रीमियर होणार अशी चर्चा आहे. आजवर अनेक चित्रपट बाहेरच्या फिल्म फेस्टिवलमध्ये गेले आहेत मात्र ‘दहाड’ ही पहिली भारतीय वेबसीरिज असणार आहे जी परदेशात दाखवली जाणार आहे.

सोनाक्षी व्यक्तिरित या वेबसीरिज विजय वर्मा आणि गुलशन देवय्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याचे दिग्दर्शन रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय यांनी केले आहे, तर एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी यांची निर्मिती आहे.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonakshi sinhas dahad webseries will be shown in berlin interntaional film festival spg