राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. राहुल देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात काय नवीन सुरू आहे याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. पण आता त्यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना सतर्क केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेले काही दिवस राहून देशपांडे यांचं नाव वापरून त्यांच्या चाहत्यांकडून बँक अकाउंटची आणि त्यांची खाजगी माहिती घेऊन काहीजण त्याचा गैरवापर करत आहेत. याबाबत एक पोस्ट शेअर करत राहूल देशपांडे यांनी त्यांच्या चाहत्यांना त्यांची फसवणूक होण्यापासून सावध केलं आहे.

आणखी वाचा : “भारतीयत्वाची भावना माझ्या मनातही प्रबळ आहे आणि…” गायक राहुल देशपांडेचं ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर

राहुल देशपांडे यांनी आज त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, “भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून मला तुम्हाला टेलिग्रामवर माझं नाव वापरून होत असलेल्या घोटाळ्याबद्दल जागरूक करायचं आहे. टेलिग्रामवर राहुल देशपांडेकडून चाहत्यांना भेटवस्तू दिल्या जात आहेत असं सांगत लोकांकडून त्यांच्या बँक अकाउंटची माहिती आणि त्यांची वैयक्तिक माहिती घेतली जात आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की, माझं टेलिग्रामवर कुठलंही अकाउंट नाही. मी तुम्हाला विनंती करतो की या प्रकारची फसवणूक होण्यापासून सावध राहा.”

हेही वाचा : राहुल देशपांडे यांनी फिल्मफेअर पुरस्कारावर कोरलं नाव, अभिमान व्यक्त करत पत्नी म्हणाली…

तर राहुल देशपांडे यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर प्रतिक्रिया देत त्यांचे चाहते याबद्दलचा त्यांना आलेला अनुभव शेअर करत आहेत. तर अनेकांनी याबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul deshpande shared a post and aware his fans from scam happening by using his name rnv