आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर असणाऱ्या तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. या चित्रपटामुळे रश्मिकाला वेगळी ओळख मिळाली. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खुप उत्सुक असतात. पण तिच्या एका कृतीमुळे आता ती ट्रोल होऊ लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रश्मिका मंदानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रश्मिका घाईघाईत तिच्या कारमध्ये बसताना दिसतेय. मात्र, कारमध्ये बसल्यानंतर ती खिडकीच्या वर काही तरी शोधण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला रश्मिकाला नक्की काय करायचंय हे कोणालाही कळलं नाही. पण नंतर ती खिडकीच्या वर असलेलं साइड स्वीच शोधत असल्याचं लक्षात आलं.

आणखी वाचा : Video: मुंबई, पुणे नाही तर रश्मिका मंदानाला भुरळ कोल्हापूरची; मराठमोळ्या ठसकेबाज अंदाजात म्हणाली…

यावेळी तिने केलेले हावभाव पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “प्लीझ अ‍ॅक्टिंग कर पण, ओव्हर अ‍ॅक्टिंग अजिबात करु नकोस”, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नॅशनल लेव्हलची ओव्हर अ‍ॅक्टिंग’. आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘ही ओव्हर अ‍ॅक्टिंगपेक्षाही वरची ओव्हर अ‍ॅक्टिंग करत आहे.” तर “ही क्यूट बनण्याचा प्रयत्न करत आहे.” त्यामुळे आता रश्मिका चांगलीच ट्रोल होऊ लागली आहे.

हेही वाचा : आता बास! रश्मिका मंदानाने ‘सामी सामी’ गाण्यावर नृत्य करण्यास दिला स्पष्ट नकार, कारण देत म्हणाली…

दरम्यान रश्मिका लवकरच ‘पुष्पा २’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली. तर आता या चित्रपटातून ती पुन्हा एकदा श्रीवल्ली म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashmika mandanna gets troll for her over acting rnv