मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी आणि त्याची पत्नी लीना यांच्या घरी २३ मे २०१६ रोजी छोट्या परी राणीचे आगमन झाले. स्वप्निलने आपल्या लाडक्या लेकीचे नाव ‘मायरा’ असे ठेवले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि स्वप्नीलची जवळची मैत्रिण सई ताम्हणकर त्याच्या लाडक्या लेकीला भेटण्यासाठी पोहचली होती.
सई ताम्हणकरने सोशल मिडीयावर तिच्या आणि मायराच्या भेटीबाबत सांगितले. मायराला भेटण्यासाठी सई थेट औरंगाबादला पोहचली होती. त्यावेळी स्वप्निल आणि मायरासोबत सईने काढलेला ‘कुल्फी’ म्हणजेच ‘कुल सेल्फी’ ट्विटरवर शेअर केला आहे. या सेल्फीत तीन महिन्यांची मायरा या दोघांसोबत दिसते. सई आणि स्वप्निलची मैत्री सर्वांनाच माहित आहे. या दोघांनीही आजवर मराठी चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.  ‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या चित्रपटांमध्ये हे दोघेही एकत्र झळकले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


काही दिवसांपूर्वीच मायराचा पहिला फोटो स्वप्निलच्या फॅन क्लबने ट्विटरवर पोस्ट केला होता. ‘लेडिज अॅण्ड जेण्टलमन प्लीज वेलकम मायरा स्वप्निल जोशी,’ अशी कॅप्शन या फोटोला टीम स्वप्निलने दिली होती. एक अभिनेता म्हणून स्वप्निल यशस्वी झाला आहे. पण ख-या आयुष्यात एक चांगला बाबा बनण्याचा प्रयत्न आता स्वप्निल करतोय. मायराचा जन्म झाल्यापासून तो जास्तीत जास्त वेळ तिच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न करतोय. इतकेच नाही तर आपल्या चिमुकलीचे डायपर बदलायलाही तो शिकतोय. लीना आणि मायरासोबत वेळ घालवण्यासाठी त्याने काही दिवसांसाठी कामातून ब्रेक घेतला होता. आता तो आपल्या आगामी चित्रपटांच्या कामाला सुरुवात करणार आहे. आगामी ‘फुगे’ या चित्रपटाद्वारे स्वप्निल त्याच्या चाहत्यांना रुपेरी पडद्यावर दिसेल. या चित्रपटात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका असून स्वप्ना वाघमारे जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तर सईचा वाय झेड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankars cool selfie with swapnil joshi and his little angle maayra