बॉलिवूड स्टार्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री सोनम कपूरची बहिण आणि अभिनेते अनिल कपूरची मुलगी रिया कपूर आज विवाहबंधनात अडकणार आहे. रिया कपूर तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणारेय. करण बूलानी असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, रिया कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड करण बूलानी हे दोघे आज सात जन्मांसाठी एकमेकांची साथ देण्याचं वचनत देत लग्नबंधनात अडकणार आहेत. रिया कपूरचा हा विवाहसोहळा तिच्या जुहू स्थित बंगल्यात पार पडणार असल्याचं कळतंय. हा विवाहसोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडणार असल्याचं देखील बोललं जातंय. रिया कपूरच्या लग्नात केवळ कुटुंबिय आणि काही जवळच्या खास पाहूण्यांनाच आमंत्रित करण्यात आलंय. रिया कपूर आणि तिचा बॉयफ्रेंड करण बूलानी हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नासाठी चाहते देखील अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. अखेर रिया कपूर तिच्या खाजगी जीवनात एका नव्या पर्वाची सुरूवात करत आहे.

कोण आहे करण बूलानी ?

रिया कपूरचा होणारा पती करण बूलानी एक दिग्दर्शक आहे. करणने यापूर्वी ‘आयशा’ आणि ‘वेकअप सिड’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एक असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलंय. सध्या करण अनेक चित्रपट आणि शोजमध्ये डायरेक्शन, प्रोडक्शन आणि डबिंगचं काम करतोय. २०१० मध्ये ‘आयशा’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रिया कपूर आणि करण बूलानीची पहिली भेट झाली होती. विशेष म्हणजे याच ‘आयशा’ चित्रपटात सोनम कपूर मुख्य भूमिकेत झळकली होती.

रिया आणि करणबद्दल आणखी एक विशेष बाब म्हणजे, इतर सेलिब्रिटींप्रमाणे या दोघांनी त्यांचं नातं सर्वांपासून लपवून ठेवलं नाही. या दोघांनी खुल्लम खुल्ला सर्वांसमोर सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त केलंय. रिया कपूर ही केवळ प्रोड्यूसरच नव्हे तर बहिण सोनम कपूरसोबत ती ‘रेशन’ नावाने आपलं फॅशन ब्रॅण्ड चालवत आहे. बहिण सोनम कपूर प्रमाणे रिया अभिनयात उतरली नसली तरी बॉलिवूडमध्ये तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलीय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam kapoor sister and anil kapoor daughter rhea kapoor is tying the knot with longtime boyfriend karan boolani prp