सोनी मराठी वाहिनी ही सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. येत्या १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवी मालिका पाहायला मिळणार आहे. याद्वारे प्रेक्षकांची नवी कोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. ‘जिवाची होतिया काहिली’ असे या नव्या मालिकेचे नाव आहे. याद्वारे ही मराठी आणि कानडी यांच्यातील प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यात अभिनेते विद्याधर जोशी आणि अतुल काळे दिसणार आहेत. विद्याधर जोशी ही अस्सल कोल्हापुरी वेशात पाहायला मिळत आहे. तर त्यांच्यावर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे असणार आहेत. ही मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

“पांडुरंगाचा टिळा आणि गुगल मॅप्सचे अनोखे कनेक्शन”, ‘ज्ञानेश्वर माऊली’ फेम अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

पहिल्या झलकमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्या वेळेस बघायला मिळाला. यात आकर्षण नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार ठरलेत. ते विद्याधर जोशी आणि अतुल काळे हे दोन्ही दिग्गज कलाकार नव्या भूमिकांत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत.

विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील बिनधास्त मुलगी वनिता खरातचे आजवरचे सर्वात बोल्ड लूक

त्यातही त्यांच्यातील होणारं चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. हे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेल, या कलाकारांचं ऑनस्क्रीन चुरसदार भांडण, उडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही.

या दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. या मालिकेत या दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या भूमिकात दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sony marathi jivachi hotiya kahili serial starting from 18 july nrp