“मस्तानीनंतर झोप…” सुबोध भावेच्या पोस्टपेक्षा कलाकारांच्या कमेंट्सचीच चर्चा

सुबोध भावेच्या पोस्टवरील मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया चर्चेत

subodh bhave, subodh bhave instagram, subodh bhave post, shruti marathe, सुबोध भावे, सुबोध भावे इन्स्टाग्राम, सुबोध बावे इन्स्टाग्राम पोस्ट, श्रुती मराठे
या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठमोळा अभिनेता सुबोध भावे सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. इन्स्टाग्रामवर सुबोध भावेचा मोठा चाहता वर्ग आहे आणि आपल्या पोस्टच्या माध्यमातून तो चाहत्यांना आगामी चित्रपट, मालिका आणि इतर प्रोजेक्ट्सबद्दल माहिती देताना दिसतो. याशिवाय तो अनेकदा अशा काही पोस्ट शेअर करतो ज्या तुफान व्हायरल होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलं आहे. सुबोध भावेनं नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सुबोध भावे सध्या पुण्यात असून तिथे तो त्याच्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग सुरू आहे. सुबोधानं त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यानं या फोटोला साजेसं कॅप्शनही दिलं आहे. त्यानं लिहिलं, ‘पुणे, पाऊस, शूटिंग आणि…’ सुबोधनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याच्यासोबत अभिनेता उमेश जगताप देखील दिसत आहे. यासोबत पुण्याची स्पेशल मस्तानी देखील या फोटोमध्ये आहे. सुबोधनं हा फोटो शेअर केल्यानंतर त्यावर मराठी कलाकरांनी धम्माल कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा- मधुबालाशी लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी बदलला होता धर्म? बहिणीनं केला मोठा खुलासा

सुबोध भावेच्या इन्स्टाग्राम पोस्टपेक्षा या कलाकारांच्या कमेंट्सचीच जास्त चर्चा आहे. अभिनेत्री श्रुती मराठेनं या फोटोवर कमेंट करताना लिहिलं, “मस्तानीनंतर झोप हे करेक्ट आहे. तुला तर माहितीच आहे.” तर अभिज्ञा भावेनं, “ओके बाय” असं म्हटलंय. याशिवाय अभिनेत्री अश्विनी कासारनं देखील सुबोधच्या फोटोवर कमेंट करत, “बासुंदी तर नाहीच पण आता मस्तानी पण नाही” असं म्हटलं आहे. या व्यतिरिक्त सुबोध भावेच्या चाहत्यांनी देखील त्याच्या या फोटोवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Subodh bhave post on instagram users comment on it goes viral mrj

Next Story
सोनाली कुलकर्णीने लंडनच्या टॉवर ब्रीजवर केला गरबा, व्हिडीओ व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी