ऐश्वर्या नारकर मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर ऐश्वर्या यांनी अभिनय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या नारकर सोशळ मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. पती अविनाश नारकर यांच्याबरोबर अनेकदा रिल्स शेअर करत असतात. नुकतच ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Video नवऱ्याच्या वाढदिवशी अमृता देशमुखने केली पोलखोल; प्रसादचा स्वभाव बघून म्हणाली “अहो…”

ऐश्वर्या नारकर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. बरोबरच त्यांनी आत्ताचे काही नवीन फोटोही शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं “माझ्या आई-बाबांनी मला एक खेळकर, प्रेमळ व अप्रतिम बालपण दिले. ते माझ्याबरोबर कायम असतात. यासाठी मी त्यांची कायम ऋणी राहीन. मी आज जे काही आहे ते फक्त माझ्या आई-वडिलांमुळेच आहे.” या पोस्टमधून ऐश्वर्या यांनी त्यांच्या आई-वडिलांचे आभार मानले आहेत.

ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं तुम्ही खुपच गोड आहात, मला तुमचे लहानपणीचे फोटो बघायचे आहेत” तर दुसऱ्याने “तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, लहानपणीसुद्धा तुम्ही इतक्या सुंदर दिसत होतात?” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा- “तुम्ही भारतीय रेल्वेत ४० वर्ष…”, ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधरचे वडील झाले सेवानिवृत्त! अभिनेत्री म्हणते, “आता…”

अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर नाटक चित्रपट आणि मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. सध्या त्या झी मराठीवरील, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेतील त्यांची खलनायिकेची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेच सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya narkar shared her childhood photos with sepcial note for her father and mother dpj