scorecardresearch

Premium

Video नवऱ्याच्या वाढदिवशी अमृता देशमुखने केली पोलखोल; प्रसादचा स्वभाव बघून म्हणाली “अहो…”

प्रसादच्या वाढदिवसानिमित्त अमृताने खास व्हिडीओ शेअर केला आहे.

prasad and amruta
प्रसादच्या वाढदिवसानिमित्त अमृताने शेअर केली खास पोस्ट

अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. १८ नोव्हेंबरला प्रसाद व अमृताने लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. प्रसाद आणि अमृता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान, अमृताने तिचा नवरा प्रसाद याच्या वाढदिवासानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- ‘आई कुठे काय करते’ फेम संजनाचा आनंद गगनात मावेना! ‘अशी’ झाली हेमा मालिनींबरोबर ग्रेट भेट, अनुभव सांगत म्हणाली…

prison rape 15 year girl
आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार
Yash Chouhan Delhi Murder Case
पैशांच्या व्यवहारातून मित्रांनीच केला घात, दिल्लीतील पोलीस आयुक्ताच्या मुलाची हत्या
Shiva Vazarkar murder
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना शहरप्रमुख शिवा वझरकर याची धारदार चाकूने हत्या, चंद्रपूर शहरात तणावाचे वातावरण
Ram Murti
सुंदर, गोड, निरागस आणि लोभस भगवान रामाच्या मूर्तीचं नामकरण; पूजाऱ्यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती!

अमृताने आपल्या इन्स्टाग्रामवर प्रसादचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृताने प्रसादचे निरनिराळे मूड स्विंग दाखवले आहेत. हा व्हिडीओ शेअर करीत अमृताने ‘हॅपी बर्थडे अहो’ अशी कॅप्शनही दिली आहे. सोशल मीडियावर अमृताचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या फोटोखाली कमेंट्स करीत प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नानंतरचा प्रसादचा हा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे हा वाढदिवस प्रसादसाठी जास्त खास आहे. अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओवर अभिजीत खांडकेकर, रश्मी अनपट यांसारख्या कलाकारांनाही कमेंट्स करीत प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं स्वत:च घर; व्हिडीओ शेअर करत म्हणाला “कर्ज, जमवाजमव अन्…”

प्रसाद आणि अमृता सध्या लग्नानंतरचे दिवस एन्जॉय करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून प्रसाद आणि अमृता घराघरांत पोहोचले. जुलै महिन्यात प्रसाद आणि अमृताने सोशल मीडियावर फोटो शेअर करीत आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर काही दिवसांपूर्वीच प्रसाद आणि अमृताचा शाही विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यात कुटुंबीय, जवळच्या नातेवाइकांबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress amruta deshmukh share wish husband prasad jawade birthday share special post on social media dpj

First published on: 30-11-2023 at 15:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×