अर्चना पुरण सिंग यांनी सिनेमात अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या कपिल शर्मा शोमध्ये प्रेक्षकांना इतर कलाकारांप्रमाणे स्किट न करता त्या आपल्या हसण्याने प्रेक्षकांना रंगतदार क्षण देतात. त्यांच्या हसण्यामुळे शोमधील काही कंटाळवाणे क्षणदेखील मनोरंजक बनतात. मात्र, कौटुंबिक संकटाचा सामना करत असतानाही असे प्रदर्शन करणे सोपे नसते. अलीकडील एका मुलाखतीत, अर्चना यांनी एका कॉमेडी शो दरम्यान आलेल्या कठीण प्रसंगाचा उल्लेख केला. त्या सांगतात की, त्यांच्या सासूबाईंचे निधन झाले होते, परंतु त्यांना तरीही शोमध्ये हसावे लागले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इन्स्टंट बॉलीवूड’ला दिलेल्या मुलाखतीत अर्चना म्हणाल्या, “एका कॉमेडी शोदरम्यान, मला बातमी मिळाली की माझ्या सासूबाई गेल्या आहेत. आम्ही त्या कार्यक्रमाचा अर्धा भाग शूट केला होता आणि मी त्यांना सांगितले की, मला जावे लागेल, परंतु त्यांनी मला शोच शूटिंग पूर्ण होईपर्यंत बसण्याची विनंती केली. त्यानंतर मला काही काळ बसून हसायला लागले.”

हेही वाचा…IMDb ने जाहीर केली आजवरच्या सर्वोत्तम २५० भारतीय चित्रपटांची नावे, 12th फेल पहिल्या क्रमांकावर

मला माहित नाही मी कसे हसले पण..

मी शोसाठी हसत होते आणि माझ्या मनात विचार येत होता की, माझ्या सासूबाई नुकत्याच गेल्या आहेत आणि आता घरात काय चालले असेल. मला माहीत नाही याकाळात, मी कसे हसले. पण ३०–४० वर्षे या इंडस्ट्रीत काम केल्यावर, तुम्हाला समजते की निर्मात्यांचे पैसे गुंतलेले असतात. तुम्ही तुमचे काम अपूर्ण सोडू शकत नाही. माझ्या पतीलाही हे समजले, असं अर्चना पुरण सिंग म्हणाल्या.

दुःखात हसण्याचा भयंकर अनुभव

पुढे अर्चना म्हणाल्या, त्यावेळी सगळं अंधारल्यासारखं वाटतं होतं. मला काहीच दिसत नव्हतं. त्यांनी फक्त ‘अ‍ॅक्शन’ म्हटलं आणि मी हसत राहिले. मी मनात विचार करत होते, इतकं वाईट कोणाचं नशीब असेल की अशा दुःखद बातमीनंतरही हसायला लागलं. पण शो चालूच राहिला पाहिजे. म्हणून मी हसले अस अर्चना पुरण सिंग म्हणाल्या.

हेही वाचा…“मानवत मर्डर्सची कथा माझ्या गावाजवळच घडली”; बालपणीच्या भीतीदायक आठवणी सांगत मकरंद अनासपुरे म्हणाले, “आमच्या दैनंदिन जीवनावर… “

अर्चनाचे मानधन इतरांपेक्षा कमी

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अर्चना पूरन सिंह यांनी त्या “द ग्रेट इंडियन कपिल शो”मध्ये ती इतर कलाकारांपेक्षा अर्ध मानधन घेतात, असे तिने स्पष्ट केले होते. या संभाषणादरम्यान, शोमधील किकू शारदा यांना विचारण्यात आले की, अर्चना फक्त बसून हसते आणि त्यासाठी पैसे मिळवते, हे पाहून त्यांना वाईट वाटते का. यावर अर्चना यांनी स्पष्ट केले, “ लोक डबल पैसे घेतात. तर बरोबर आहे ना, मेहनत करा मला हसण्यासाठी यांच्यापेक्षा कमी पैसे मिळतात, तर त्यांना स्किटसाठी अधिक मेहनतीसाठी अधिकचे पैसे मिळतात.”

हेही वाचा…ऑक्टोबर महिन्यात सिनेमांची मेजवानी! मराठीसह ‘हे’ बहुप्रतीक्षित बॉलीवूड चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

नुकतंच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या ताज्या भागात ‘देवरा’ सिनेमाच्या कलाकारांचा समावेश होता जान्हवी कपूर, ज्युनियर एनटीआर, आणि सैफ अली खान. हा भाग सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Archana puran singh shares experience had to laugh in comedy show while mother in law passed away psg