Bigg Boss Marathi Season 5 : नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यामुळे घरातील सदस्यांची समीकरणं आता बदलली आहेत. ‘भाऊची चक्रव्यूह रुम’मधून निक्कीने चुगली ऐकल्यापासून ती आता ‘ए टीम’विरोधात खेळताना दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी ‘ए टीम’मधील कुठल्याही सदस्याच्या हाती लागू देणार नाही, असा पवित्रा निक्कीने घेतला आहे. निक्की विरुद्ध ‘ए टीम’ हे शत्रूत्व किती काळ असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. निक्की ‘ए टीम’मधून बाहेर पडल्यापासून ती सतत अभिजीतबरोबर दिसत आहे. घरातील अनेकांना आता निक्की-अभिजीत एकत्र राहणं खटकतं आहे. पण निक्कीसाठी अभिजीत किती महत्त्वाचा आहे? त्याच्याबद्दल निक्कीला किती माहित आहे? याविषयी अरबाज घरातील सदस्यांना सांगताना दिसला. याच वेळी अरबाजने वर्षा उसगांवकरांचा एक किस्सा सांगितला. यासंबंधित व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अरबाज घरातील सदस्यांना अभिजीत संबंधित काही किस्से सांगत आहे. सर्वात याआधी त्याने निक्कीचा किस्सा सांगितला. त्याने एकेदिवशी निक्कीला अभिजीतच्या वाढदिवसाची तारीख विचारली तेव्हा तिने लगेच आणि अचूक उत्तर दिलं. पण जेव्हा अरबाजच्या वाढदिवसाची तारीख विचारली. तेव्हा निक्की चुकीची सांगू लागली. त्यानंतर १, २, ३ असे आकडे बोलू लागली. त्यामुळे मला राग आला, असा किस्सा त्याने सांगितला. हे ऐकून अंकिता म्हणाली, चाळीशीतला असा चार्म आम्हाला पण मिळू दे रे देवा. त्यानंतर अरबाजने वर्षा उसगांवकरांचा किस्सा सांगितला.

हेही वाचा – Video: दहीहंडीमुळे एजे-लीलाच्या नात्यात प्रेमाचा रंग बहरणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत नेमकं काय घडणार? वाचा..

‘बिग बॉस’च्या घरात एकच सेक्सी आहे – वर्षा उसगांवकर

अरबाज म्हणाला, “ताई काय म्हणतात माहितीये का? मी भांडी घासत होतो. मस्त डान्स वगैरे करत काम करत होतो. तर मी वर्षा ताईंना म्हटलं, तुम्ही इतकी सेक्सी मुलं भांडी घासताना आणि जेवण बनवताना पाहिली आहेत का? त्या म्हणतात, सेक्सीला काय करायचं. सेक्सी असा पाहिजे की, पूर्ण लक्ष त्याच्याकडे जायला पाहिजे. मी म्हटलं कोण आहे? तर म्हणतात, घरात एकच सेक्सी आहे. मी पुन्हा विचारलं, कोण? तर म्हणतात, अभिजीत. त्याच्या आवाजात किती सेक्सीपणा येतो. तू रात्री बघितलं नाही का? मी म्हटलं, ताई यार.” ( Bigg Boss Marathi )

हेही वाचा – Video: आजपासून सुरू होणार तुळजाचा लग्नसोहळा, सूर्याने दिलं आमंत्रण; पण तुळजा कोणाशी लग्नगाठ बांधणार सिद्धार्थ की सत्यजितशी?

त्यानंतर धनंजय पोवार मजेत म्हणाला, “माझ्या बाजूला झोपला तरी मला कधी जाणवलं नाही. त्यावर सगळ्या सदस्यांचा एकच हशा पिकला.” ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरातला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi season 5 arbaaz patel narrated a story of varsha usgaonkar pps